चोपड्यात हिवताप प्रतिरोध एक दिवस – एक कार्यक्रम संपन्न

चोपड्यात हिवताप प्रतिरोध एक दिवस – एक कार्यक्रम संपन्न
चोपडा प्रतिनिधी :—-


जिल्हा हिवताप अधिकारी डॉ अपर्णा पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर व नगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ चंद्रकांत बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पर्यवेक्षक जे वाय बाविस्कर यांनी संपूर्ण चोपडा तालुक्यात हिवताप प्रतिरोध एक दिवस – एक कार्यक्रम राबवून शहर व प्रत्येक खेड्यात हिवताप प्रतिरोध हस्तपत्रिका वाटप करून जनतेत जनजागृती करण्यात आली.
हिवताप प्रतिरोध एक दिवस – एक कार्यक्रम राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्यात येतो

. हिवताप विषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण होऊन प्रतिरोध उपाययोजनांच्या अंमलबजावणीमध्ये त्यांच्या सक्रिय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमांद्वारे जनतेपर्यंत माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करणे हा मोहिमेच्या प्रमुख उद्देश आहे . हिवताप हा किटकजन्य आजार असून अनेक आजारांपैकी एक गंभीर व मानवाचे जीवघेणा आजार आहे . या रोगाचे प्रमुख खाद्य मानवी रक्तातील तांबड्या रक्तपेशी मधील हिमोग्लोबिन होय . या रोग जंतू मुळे हिवताप हा आजार होतो. त्यावर योग्य तो उपचार माहीत नसल्यामुळे हिवतापाच्या आजाराने अनेक लोक मृत्युमुखी पडत असत. सर्वप्रथम सन १८८९ मध्ये डॉ सर रोनाल्ड रॉस या शास्त्रज्ञाने रोगजंतूंचा शोध लावला व त्यामुळे हिवतापावर योग्य तो उपचार करणे शक्य झाले . हिवतापाचा प्रसार ॲनाफिलीस या जातीच्या डासांमार्फत होतो .या जातीच्या डासाची मादी घरातील वापरण्यासाठी साठविण्यात आलेल्या पाण्याच्या साठ्यामध्ये , स्वच्छ पाण्याची डबकी ,नारळाच्या करवंट्या , जुने टायर्स इत्यादी वस्तूंमध्ये साठलेल्या पाण्यामध्ये अंडी घालतात व तेथे त्या अंड्या पासून नवीन डासाची उत्पत्ती होऊन अशाप्रकारे डासांची संख्या वाढवून हिवतापाचा प्रसार वेगाने होण्यास मदत होते तर जनतेमध्ये या आजाराविषयी जनजागृती करणे व त्या संदर्भाची माहिती पत्रके जनतेपर्यंत पोहोचवणे यासाठी हिवताप प्रतिरोध महिना एक दिवस – एक कार्यक्रम चोपडा नगरपालिकेचे मार्फत घेण्यात आला. त्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रदीप लासूरकर ,नगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ चंद्रकांत बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पर्यवेक्षक जे वाय बाविस्कर , आरोग्य सेवक , आशा वर्कर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More