चोपडा काँग्रेसतर्फे नाना पटोले यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

चोपडा काँग्रेसतर्फे नाना पटोले यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
चोपडा प्रतिनिधी :—


चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष एड. संदीप पाटील यांच्या सूचनेनुसार नाना पटोले यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.


गरजू आणि गरीब कुटुंबांना प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन , त्यांना गहू व तांदूळ वाटप करण्यात आले. दि. ५ जून रोजी आदिवासी व अनेक निराधार कुटुंबांना प्रत्येकी पाच किलो गहू व तीन किलो तांदूळ देण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अजाबराव पाटील, चोपडा शहर काँग्रेसचे अध्यक्ष के .डी .चौधरी , चोपडा तालुका समन्वयक व मार्केट कमिटीचे माजी उपसभापती नंदकिशोर सांगोरे, नगरपालिका आरोग्य सभापती सौ सुप्रिया सनेर, कांतीलाल सनेर, एन. एस. यु .आय.राज्य सचिव चेतन बाविस्कर, एन एस यु आय शहराध्यक्ष हर्षवर्धन पवार , सतीश बागुल , लतीश बागुल आदी उपस्थित होते.


त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात मास्कचे वाटप करण्यात आले.
त्यानंतर श्रीराम नगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले .वृक्षारोपण करताना चोपडा शहराध्यक्ष के.डी.चौधरी एन एस यु आय राज्य सचिव चेतन बाविस्कर , चोपडा शहर एन एस यु आय अध्यक्ष हर्षवर्धन पवार , सतीश बागुल आदी मान्यवरांनी वृक्षारोपण केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More