गोरगावले रस्त्याची एक बाजू डांबरीकरणासह पुर्णत्वास , चोपडा शहरातील रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी प्रयत्न करणार जगन्नाथ बाविस्कर यांनी दिली माहिती

गोरगावले रस्त्याची एक बाजू डांबरीकरणासह पुर्णत्वास..
जगन्नाथ बाविस्कर यांनी दिली माहिती.


चोपडा(प्रतिनिधी) तालुक्यातील गोरगावले बुद्रुक रस्त्याची एक बाजू मजबुतीकरण,खडीकरण व डांबरीकरणासह पूर्णत्वास येत आहे.मागील महिन्यात हेच काम संथ गतीने सुरू होते.मध्यंतरी ठेकेदाराने ह्या कामावरील मजूर व वाहन व्यवस्था अन्यत्र ठिकाणच्या कामावर हलविल्याने येथील काम बंद अवस्थेत होते. याबाबत आपल्या वृत्तपत्रात व ऑनलाईन मिडीयात गोरगावले बुद्रुक, खेडीभोकरी रस्ता दुरुस्तीच्या कामाला गती मिळावी,अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, व याबाबतचे निवेदन सुध्दा चोपडा तहसीलदार यांना देण्यात आलेले होते.संबंधितांनी ह्या कामाला पंधरा दिवसात गती देऊन शहरातील न.प. हद्दीच्या पुढील गोरगांवले रस्त्याची एक बाजू तात्काळ डांबरीकरणासह पूर्णत्वास आणली अाहे.

आता ह्या रस्त्यावरून एका बाजुने वापरता येणार आहे.तसेच दुसर्या बाजुकडील रस्तादुरूस्ती कामाला सुध्दा सुरूवात करण्यात आली आहे,अशी माहिती गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ टि.बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये दिली आहे.


शहरातील रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी प्रयत्न
चोपडा शहर न.प.हद्दीतील गोरगावले रस्ता कॉंक्रिटीकरण कामाबाबत ठेकेदार यांचेशी जगन्नाथ बाविस्कर यांनी चर्चा केली असता त्यांनी सांगीतले की,रस्त्याच्या दोन्ही बाजुची पाणीपुरवठा पाईपलाईन व अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. याबाबत न.प.चे गटनेते जिवनलाल चौधरी यांचेशी चर्चा केली असता त्यांनी तात्काळ पाईपलाईन काढणेकामी सुरूवात केली.तसेच सां.बा.चे अभियंता प्रमोद सुशिर यांनी अतिक्रमीत जागेबाबत भुमीअभिलेख विभागाकडे पत्र पाठविल्याचे सांगीतले आहे. रस्ता मोकळा होताच कॉंक्रिटीकरण कामास सुरूवात होऊ शकते.तरिही ह्या रस्त्याचे त्वरित काँक्रिटीकरण व्हावे, याबाबतचे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे. या निवेदनावर गोरगावलेचे माजी सरपंच श्री.व सौ.आशाबाई जगन्नाथ बाविस्कर, आदर्श घुमावल बुद्रुकचे सरपंच वसंतराव पाटील,एस्.टी.कोळी संघटनेचे प्रतिनिधी मधुसूदन बाविस्कर,लखिचंद बाविस्कर, वैभवराज बाविस्कर,सामा.कार्यकर्ते भगवान वैदु यांचेसह चोपडा शहर न.प.हद्दीतील नगरवासीयांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More