तालुका क्रीडा संकुल कार्यकारी समिती गठीत

तालुका क्रीडा संकुल कार्यकारी समिती गठीत


चोपडा प्रतिनिधी :—-
चोपडा तालुक्यातील तालुका क्रीडा संकुल समिती गठीत करण्यात आली असून त्या समितीवर पदसिद्ध सदस्य आणि आमंत्रित सदस्य म्हणून मा ना गुलाबराव पाटील ( मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता महाराष्ट्र राज्य मुंबई) तथा पालक मंत्री जळगाव जिल्हा यांचे पत्र अन्वये तालुका क्रीडा संकुल समिती चोपडा वर आमंत्रित सदस्य म्हणून शारीरिक शिक्षण शिक्षक तालुका क्रीडा मंडळ यांचे प्रतिनिधी म्हणून योगेश कृपानाथ चौधरी (चोपडा ) ,तालुका मुख्याध्यापक शारीरिक शिक्षक संघटना प्रतिनिधी म्हणून संजय पुंडलिक बाविस्कर (हातेड खु!!) , तालुक्यातील राष्ट्रीय व राज्य पातळीवरील खेळाडूंचा प्रतिनिधी म्हणून धीरज दिनकर बाविस्कर (चहार्डी ) , तालुक्यातील महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेच्या एक सदस्य म्हणून देविदास हिरामण महाजन ( धानोरा ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे .


तालुका क्रीडा संकुल समितीवर वरील चार सदस्यांची निवड झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे . सदर निवडीचे पत्र अरविंद खांडेकर ( क्रीडा मार्गदर्शक तथा सदस्य सचिव , तालुका क्रीडा संकुल समिती चोपडा ) यांनी पत्राद्वारे कळविले आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More