पुनश्च हरिओम..!चोपडा सूतगिरणीतून दोन वर्षांच्या अंतरानंतर सूत विदेशात रवाना : सूत नेणाऱ्या ट्रॅाल्याचे पुजन..

पुनश्च हरिओम..!चोपडा सूतगिरणीतून दोन वर्षांच्या अंतरानंतर सूत विदेशात रवाना : सूत नेणाऱ्या ट्रॅाल्याचे पुजन..

चोपडा – येथील चोपडा तालुका शेतकरी सहकारी सुतगिरणीने आज दोन वर्षांच्या अंतरानंतर आपले उच्च प्रतीचे सूत परदेशात रवाना करण्यासाठी आज पहिल्या ट्रॅाल्याचे पुजन चेअरमन माजी आ.कैलास बापू पाटील व संचालकांच्या हस्ते करण्यात आले.याबाबत अधिक माहिती अशी की,चोपडा सूतगिरणीने २०१८/१९ मध्ये अत्यंत दर्जेदार तयार झालेल्या सूताची चीन व इतर परदेशात मोठ्या प्रमाणावर निर्यात केली होती.त्यामुळे ‘चोपडा सूत’ म्हणून बाजारपेठेत आपला दबदबा सूतगिरणीने निर्माण केला होता.परंतु भारत व चिन मधील तणावाचे परस्पर संबध तसेच कोविड१९ च्या संसर्गामुळे निर्यातीवर बंदी असल्याने दर्जेदार असूनही सूत परदेशात जात नव्हते.तथापि शासनाने निर्णय बदलल्यानंतर आज दि.९ जून रोजी चीनसाठी सूतगिरणीच्या कार्यस्थळावरुन वीस टन सुतचा पहिला ट्रॅाला रवाना करण्यात आला

सूतगिरणीच्या या ‘पुनश्च हरिओम’ बाबत तालुक्यात कौतुक होत आहे.या ट्रॅाल्याचे पूजन सूतगिरणीच्या संचालिका रंजना नेवे व माजी संचालक श्रीकांत नेवे यांच्या हस्ते विधिवत करण्यात आले.तसेच श्रीफळ वाढवून चेअरमन माजी आ.कैलास पाटील,संचालक तुकाराम पाटील यांचे सह अधिकारी व कामगारांनी पूजन केले.यावेळी सूतगिरणीचे जनरल मॅनेजर विजय पाटील,अधिकारी रतन पाटील, गुलाबराव मराठे,महेश उपाध्याय यांचेसह कर्मचारी व कामगार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More