मा.विधानसभा अध्यक्ष प्रा अरुणभाई गुजराथी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या चोपड्यात विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन

मा. विधानसभा अध्यक्ष प्रा अरुणभाई गुजराथी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या चोपड्यात विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन

चोपडा प्रतिनिधी :—


महाराष्ट्र राज्याचे नेते तथा राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या वाढदिवस निमित्त उदया ११ जून रोजी चोपडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


कार्यक्रमात सकाळी १० वाजता पिपल्स बॅंक हॉल येथे रक्तदानशिबीर , चोपडा नगर परिषद राबवीत असलेल्या ५ कोटी ६० लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन प्रा अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते होईल.


लासुर अडावद,चहार्डी येथील अपंग बांधव भगिनीं साठी तीन चाकी सायकल वाटप,कोरोना महामारीच्या काळात ज्यांनी सेवा दिली,आर्थिक मदत केली त्यांचा सत्कार,राष्ट्रवादी पक्षाचे नूतन पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात येणार आहे .
प्रा अरुणभाई यांची अमृत (आंबे ) तुला करण्यात येणार आहे व प्रा अरुणभाई गुजराथी यांच्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींनी पुष्पगुच्छ किंवा हार न आणता वही व पेन आणावी जेणेकरून गरजूंना वाटप करता येईल . सदर कार्यक्रमांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हजर रहावे असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More