मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

चोपडा प्रतिनिधी-


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज पर्यंत सर्व घटकांचा विचार केला आहे.हाच उद्धेश डोळ्या समोर ठेऊन १० जुन पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनी “एक पत्र मराठा युवकांच्या उज्वल भविष्यसाठी” हा उपक्रम पक्षातर्फे राबविण्यात आला .


मराठा समाजाला’ आरक्षण मिळावे म्हणून पक्षाच्या वतीने एक कोटी पत्र युवकांच्या उज्वल भविष्यसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहावे असा आदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटिल यांनी दिला होता.म्हणून आज रोजी चोपडा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाद्वारे पत्र लिहिण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष मनोज पाटील,प्रसिद्दिप्रमुख संदीप कोळी,सेवादल अध्यक्ष सतिश पाटिल,उपाध्यक्ष कल्पेश पाटील,तसेच विद्यार्थी तालुका अध्यक्ष उर्वेश साळुंखे,उपाध्यक्ष जयेश सनेर आदि कार्यकर्ते उपस्थीत होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More