कठोरे गावातील चोपडा पाणीपुरवठा अपूर्ण बांधकाम – गावाला पुराचा धोखाकठोरे गावातील चोपडा पाणीपुरवठा अपूर्ण बांधकाम – गावाला पुराचा धोखा

कठोरे गावातील चोपडा पाणीपुरवठा अपूर्ण बांधकाम – गावाला पुराचा धोखा

चोपडा प्रतिनिधी :–


हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळदार पावसामुळे धरणातून तापी पात्रात ८ दरवाज्यातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज कठोरे गावलगतच्या तापी नदीपात्रात पाण्याची लोंढा आलेला आणि त्यामुळे चोपडा नगरपरिषदच्या नव्या पाणीपुरवठा योजनेचे सुरू असलेले अपूर्ण बांधकाम संपूर्ण पाण्याखाली गेले आहे. चोपडा नप कडून तापी पात्रात करण्यात आलेल्या खोदकामामुळे कठोरे गावाला भविष्यात पुराचा धोखा निर्माण झालेला आहे.


कठोरे गावांत नदीपात्रात एक उपसा विहीर आणि काठावर एक चाचणी विहीर यासाठी मोठ्याप्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे, ५० मीटर व्यास आणि १०० फुटाच्या वर खोली असलेला मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. या सर्व खोदकामामुळं भविष्यात तापी नदीला महापूर आला तर कठोरे गावाला त्याचा खूप मोठा फटका बसेल.. चोपडा नप आणि ठेकेदार यांनी या बांधकाम करण्यासाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था लावलेली नाही.
तीन आठवड्यापासून कठोरे गावाचा चोपडा नप पाणीपुरवठा योजनेसाठी तापी नदीपात्रात कायमस्वरूपी जिवंत जलसाठा असावा आणि त्यासाठी नदीवर बांध बांधण्यात यावा या मागणीसाठी पाईपलाईन कामाला विरोध संदर्भात आंदोलन चालू असताना कठोरे गावाला पुराचा धोखा निर्माण झालेला आहे. त्यामुळे गावात खूप भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरलेलं आहे.
आज नदीपात्रातील पाहणी करण्यासाठी आंदोलनकर्ते अशोक गोरख पाटील आणि दिपक मदन पाटील ये उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More