राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ५ लाभार्थ्यांना मा. आमदारांच्या हस्ते धनादेशाचे वाटप आणि समितीची बैठक वाटप

राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ५ लाभार्थ्यांना मा. आमदारांच्या हस्ते धनादेशाचे

वाटप आणि समितीची बैठक

आज दिनांक 14 रोजी मा. आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे, चोपडा विधानसभा मतदार संघ यांच्या हस्ते तहसिल कार्यालय चोपडा येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेचे, प्रति लाभार्थी रक्कम रुपये 20,000/- मात्र चे धनादेश असे एकूण 5 लाभार्थ्यांना रक्कम रुपये 100000/- एवढी रक्कम वाटप करण्यात आली.

तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेंतर्गत येणाऱ्या विविध योजनेचे एकुण 268 प्रकरणांवर निर्णय घेण्यात येवुन मंजूर करण्यात आली आहेत. तसेच कार्यालयाची पाहणी करुन कर्मचारी यांना योग्य त्या सुचना दिल्यात त्यावेळी म. तहसिलदार श्री. अनिल गावीत, प्र.संगायो नायब तहसिलदार श्री राजेश पऊळ, इंगांयो अव्वल कारकुन श्रीमती. वाय एच न्हाळदे तसेच लिपीक जे ए पवार व आय टी व असिस्टंट समाधान कोळी हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More