अडावद आरोग्य केंद्रातंर्गत मान्सूनपुर्व जलजन्य आजाराबाबत सर्वेक्षण करण्यात आले.


चोपडा प्रतिनिधी :–
पावसाळ्यात अशुध्द पाणी पिल्यामुळे डायरिया, उलटी, कावीळ असे अनेक जलजन्य आजारांचा उद्रेक होऊन प्रसंगी मृत्यु देखील होत असतात, त्या अनुषंगाने.. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार यांच्या सूचनेनुसार,
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदिप लासुरकर,वैद्यकीय अधिकारी डॉ.दायमा यांच्या मार्गदर्शनाखाली.. अडावद आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे.

आरोग्य उपकेंद्र-वडगांव बु.येथे साथरोग (जलजन्य आजारा) बाबत… सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाकीची स्वच्छता व साथरोग मोहीम राबविण्यात आली. त्यात पाण्याच्या टाक्या धुणे, टाकीचा परिसर स्वच्छ करणे, व्हाल गळती, पाईपलाईन गळती,तोटी नसलेले नळ, खोल खड्डे असलेल्या अश्या सर्व ठिकानांचा सर्वेक्षण करून, नियमित पाणीपुरवठा शुद्धीकरण करण्याबाबतच्या सूचना दिल्या. प्रसंगी… आरोग्य सेवक-विजय देशमुख यांनी
ग्रामसेवक-कांतीलाल कोळी, जलसुरक्षक-भगवान प्रताप पाटिल यांचे समवेत गावात साथरोग सर्वेक्षण करण्यात आले.













