युवा परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी अनिल बाविस्कर

युवा परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी अनिल बाविस्कर

चोपडा – देशातील तरुणाईला दिशादर्शक असणारी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी विविध उपक्रम राबवणारी नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडिया अर्थातच भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निमगव्हाण (ता.चोपडा) येथील तापी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल शिवाजी बाविस्कर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे,


दि.७ जून रोजी त्यांना निवडपत्र प्राप्त झाले,
अनिल बाविस्कर यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्य लक्षात घेता युवा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.रामू यांच्या मार्गदर्शनाने व युवा परिषदेचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा लंगडी असोसिएशनचे जिल्हा सचिव राहूल वाकलकर (चाळीसगाव), प्रदेश उपाध्यक्ष तथा यावल शेतकी संघाचे संचालक तेजस पाटील (यावल) यांच्या शिफारशीनुसार राज्य परिषदेचे अध्यक्ष डॉ.त्रेवीणीकुमार कोरे (कोल्हापूर) यांनी ही निवड केली आहे,


युवा परिषदेच्या माध्यमातून युवकांचा सामाजिक कार्यात सहभाग वाढवून विधायक कार्य करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी बाविस्कर यांनी १ वर्ष उपाध्यक्षपद भुषविले आहे, या कार्यकाळात त्यांनी सहका-यांच्या सहकार्यातून व युवा परिषदेच्या माध्यमातून विविध समाजहिताचे उपक्रम जिल्ह्याभरात राबविले आहेत, तर चोपडा येथील महात्मा गांधी महाविद्यालयात विद्यार्थी परिषदेचे अध्यक्षपद देखील भूषविले आहे,
विविध क्षेत्रात कार्य करणारा युवा चेहरा म्हणून अनिल बाविस्कर यांची समाजात ओळख राहिली असून या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More