राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत पंकज विद्यालयाचा महेश बाविस्कर या विद्यार्थ्यांची ची राष्ट्रीय पातळीवर निवड…..

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत पंकज विद्यालयाचा महेश बाविस्कर या विद्यार्थ्यांची ची राष्ट्रीय पातळीवर निवड…..


चोपडा प्रतिनिधी :–
येथील पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १० वी चा विद्यार्थी महेश हुकूम बाविस्कर याने एनसीईआरटी नवी दिल्ली आयोजित नोव्हेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध ( एन टी एस ) परीक्षेत उतुंग यश संपादन करत राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या परीक्षेसाठी पात्र ठरला आहे. राष्ट्रीय स्तरावरील सर्वाधिक शिष्यवृत्ती देणाऱ्या या स्पर्धापरीक्षेच्या राष्ट्रीय पातळीवर निवड होणारा महेश बाविस्कर हा विद्यालयाचा सातवा विद्यार्थी ठरला आहे .


एनसीईआरटी नवी दिल्ली दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा राज्यस्तरावर घेत असते आणि या परीक्षेत गुणवत्ता यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर परीक्षा घेऊन दरवर्षी संपूर्ण देशातून निवड होणाऱ्या २००० विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण पर्यंत शिष्यवृत्ती देत असते. अशा या शिष्यवृत्ती परीक्षेत पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे आतापर्यंत ७ विद्यार्थी दुसऱ्या लेव्हल साठी निवडले गेले आहेत. महेश हुकूम बाविस्कर याने १५१ गुण मिळवत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत एस सी संवर्गातून १५ वी रँक प्राप्त करत ऐतिहासिक यश संपादन केले आहे.

आणि कोरोना काळातही ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या पंकज विद्यालयाच्या इतिहासात अजून एक मानाचा शिरपेच रोवला. कोरोना काळातही महेशने आई – बाबांच्या सहकार्यमुळे, शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि कठोर परिश्रमाने एन टी एस सारख्या सर्वोत्कृष्ट स्पर्धा परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले आहे. चि. महेशच्या या देदीप्यमान यशाचं कौतुक संस्थाध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे , संचालक पंकज बोरोले, नारायण बोरोले, मुख्याध्यापक व्ही आर पाटील, आणि संस्थेतील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
/या यशा निमित्त आयोजित सत्कार प्रसंगी महेशच्या पालकांनी शाळा, संस्था आणि शिक्षकांबद्दल गौरोवदगार काढले. महेशच्या या नेत्रदीपक यशाचं संपूर्ण पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More