बालमोहन विद्यालयात योग दिवस साजरा #योगा डे निमित्त एकम योगा चॅलेंजचे आयोजन

बालमोहन विद्यालयात योग दिवस साजरा
चोपडा प्रतिनिधी :—


चोपडा शहरातील बालमोहन विद्यालयाच्या प्रांगणात योग दिवस साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे अमर संस्थेचे व्यवस्थापक मुकेश चौधरी उपस्थित होते. योग काय आहे? योगासनाचा इतिहास? योगासनाचे प्रकार व महत्व उपशिक्षक मयुरेश्वर सोनवणे यांनी विशद दिले तर योगशिक्षक रविंद्र साळुंखे व देवेंद्र केदारे यांनी विविध योगासने व प्राणायामाच्या कृती करुन घेतल्या.


कार्यक्रमाला मुख्याध्यापक प्रदीप चौधरी , रेखा पाटील , दिवाकर नाथ,अब्दुल मोईद सैय्यद, राकेश महाजन,विकास गोहिल,विनय पाटील,चंद्रकांत पाटील, राहुल पाटील, संजय पाटील,श्याम पावरा, गोपाल पाटील, शेखर पाटील , सुनीता साठे, वंदना पाटील, सोनाली साळुंखे ,रोहिणी कापडणे, वैशाली वसईकर, प्रतिभा पाटील, अनिता मैलागिर व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते…

योगा डे निमित्त एकम योगा चॅलेंजचे आयोजन

जगभरातील योगा प्रेमींसाठी ‘एकम योगा चॅलेंज’ या अनोख्या ऑनलाईन मोफत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जीवनमुक्त संत आणि तत्वज्ञानी श्री प्रीताजी यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

सोमवारी (ता. २१) एकवीस मिनिटांसाठी हे योगा चॅलेंज असेल. यामध्ये हठयोग, कर्मयोग, राजयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग शिकवले जाणार आहे.

योगा प्रेमींना आपल्या घरामध्ये बसून, ग्रुपमध्ये किंवा कार्यालयातील सहकाऱ्यांसह ऑनलाइन स्वरूपात सहभाग घेता येईल. खाली दिलेल्या लिंकद्वारे स्पर्धेत सहभाग घेता येईल.
https://online.ekam.org/a/2147488586/tcoseyAh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More