दिल्लीच्या आयसीएमआर पथकाने वढोदा गावातील नागरिकांचे रक्तजल नमुने घेतले ;
अँटिबॉडीज तपासणीसाठी नमुने चेन्नईला रवाना

दिल्लीच्या आयसीएमआर पथकाने वढोदा गावातील नागरिकांचे रक्तजल नमुने घेतले ;
अँटिबॉडीज तपासणीसाठी नमुने चेन्नईला रवाना

चोपडा ( प्रतिनिधी )—–
दिल्ली येथील आयसीएमआरच्या पथकाने वढोदा (ता.चोपडा) येथे भेट देऊन
कोविड (१९) संसर्गाच्या संशोधनासाठी गावातील विभिन्न वयोगटातील ४० नागरिकांचे रक्तजल नमुने घेऊन माणसाच्या शरीरातील अँटीबॉडीज तपासणीसाठी नमुने चेन्नई येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत.अशी माहिती हातेड बु! येथील
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.
दिनेश देवराज यांनी दिली.


दिल्ली येथील आयसीएमआरच्या पथकाने चोपडा तालुक्यातील वढोदा येथे भेट देऊन गावातील
विविध भागातील विभिन्न वयोगटातील ४० नागरिकांचे रक्तजल नमुने घेतले.कोविड- (१९) संसर्गाच्या संशोधनासाठी माणसाच्या शरीरातील
अँटीबॉडीज तपासणीसाठी रक्तजल नमुने चेन्नई येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत.
वढोदा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात नागरिकांचे रक्तजल नमुने घेण्यात आले.दिल्ली येथील आयसीएमआरच्या पथकात जागतिक आरोग्य संघटनेचे नाशिक येथील डॉ.प्रकाश नांदापूरकर,संचालक कुष्ठरोग अधिकारी डॉ. इरफान तडवी,आयसीएमआरचे सदस्य डॉ.सौरभ तिडके यांचा समावेश होता.पथकातील डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर,हातेड बु! प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश देवराज,डॉ. राहुल पाटील,डॉ.विनायक पाटील,नरेंद्र सूर्यवंशी प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुनील सैदाणे,प्रवीण पाटील, आरोग्य सहाय्यक,श्रीमती व्ही.आर.खान,आरोग्य सेविका व आशासेविका इत्यादींनी सिरो सर्व्हेची जबाबदारी पार पाडली.यावेळी युवा सेनेचे गोपाल चौधरी व ग्रामपंचायत सदस्यांनी नागरिकांमध्ये सर्वेक्षणा विषयी जनजागृती करण्यासाठी विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More