मेलाणे ग्रामपंचायतीत विकास कामांच्या खर्चीत निधीत तफावत;ग्रामसेवकाची माहिती देण्यास टाळाटाळ.माहीत न मिळाल्यास उपोषण करणार प्रताप पावरा…

मेलाणे ग्रामपंचायतीत विकास कामांच्या खर्चीत निधीत तफावत;ग्रामसेवकाची माहिती देण्यास टाळाटाळ.माहीत न मिळाल्यास उपोषण करणार प्रताप पावरा…

चोपड़ा (प्रतिनिधी)-तालुक्यातील मेलाणे ग्रामपंचायतीला विकास कामाचा निधी व खर्चित झालेला निधी यात तफावत असल्याने याविषयी ग्रामसेवक

यांच्याकडे प्रताप खाज्या पावरा यांनी माहिती मागितली असता त्यांनी टाळाटाळ केल्याने प्रताप पावरा यांनी माहिती अधिकारात वरिष्ठांकडे माहिती मागितली आहे. गेल्या पाच वर्षांत सदर गावात समाधानकारक विकास दिसत नसल्याने मेलाणे गावातील तरुणांनी सरपंच व ग्रामसेवक यांना या बाबत जाब विचारला असता त्यांनी

समाधानकारक माहिती दिली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत ई. ग्राम स्वराज या महाराष्ट्रा सरकार ची अधिकृत वेबसाईट वर पाहिले असता विकास कामे व खर्च केलेली रक्कम यात खुप तफावत आढळत असल्याचे प्रताप खाज्या पावरा यांची तक्रार आहे. तरी प्रताप खाज्या पावरा व त्यांचे सहकारी यांनी माहीती अधिकार या कायद्याच्या वापर करून माहीती मिळवण्याचा प्रयत्न केला पण ग्रामसेवक अशोक पाडवी यांनी माहीती देण्यास टाळाटाळ केली असल्याने गटविकास अधिकारी यांच्याकडे आम्ही अपील अर्ज केला असून आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही उपोषणाला बसु असा इशारा मेलाणे ग्रामस्थांसह प्रताप पावरा यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More