आॕर्किड इंटरनॕशनल स्कूलमध्ये ३ जूलै रोजी राजमाता जिजाऊ पुण्यतिथी साजरा

चोपडा येथील यशोधन चॕरिटेबल ट्रस्ट संचलीत आॕर्किड इंटरनॕशनल स्कूल मध्ये ३ जूलै रोजी राजमाता जिजाऊ पुण्यतिथी (तिथीप्रमाणे) आॕनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक .उमेश महाजन यांनी राजमाता जिजाऊ यांची महती सांगितली. संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.राहूल पाटिल यांनी जिजाबाई केवळ आदर्श आई नव्हे तर उत्तम शासक आणि पत्नी होत्या

.तसेच त्या प्रेरणादायी आजीही होत्या .त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेक स्त्रियांसाठी आदर्श आहे.जिजाऊ या त्या काळातही घराची आणि रयतेच्या राज्याची जबाबदारी तितक्याच धैर्याने आणि संयमाने सांभाळत होत्या. घरसंसार आणि करियर यांच्यामध्ये कसरत करणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी आजही त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी आहे अशी महत्ता सांगून
राजमाता जिजाऊंना आदरांजली. वाहीली. तसेच सध्याच्या करोनाच्या भीषण परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना घरी राहा,सुरक्षित व निरोगी राहा,खूप अभ्यास करा असा मौलिक उपदेश दिला. कार्यक्रमास ज्यु.के.जी, सिनि.के.जी. व इ.१ ली ते ५ वीचे विद्यार्थी व पालक माता,भगीनी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी .नितेश वाघ यांनी आभार मांडले . संपूर्ण कार्यक्रम आॕनलाईन पध्दतीने यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक .उमेश महाजन, समन्वयक,शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.













