माजी मंत्री आ.गिरिश महाजन यांच्यासह १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई

माजी मंत्री आ.गिरिश महाजन यांच्यासह १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई

मुंबई वृत्तसंस्था – आज विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षणावरून
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली त्यामुळे भाजपच्या१२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबीत करण्यात आले असून यात माजी मंत्री तथा जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांचा समावेश आहे.ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडून एम्पिरिकल डेटा मागवण्याबाबत ठराव मांडण्यात आला.यावेळी विरोधकांनी गोंधळ घातला


गोंधळातच सभागृहात ठराव मांडण्यात आला. त्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आवाजी मतदानाने ठराव मंजूर केला. ठराव विधानसभेत पारित होत असताना विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते.

यावेळी
आमदार संजय कुटे आणि गिरीश महाजन यांच्यासह अनेक आमदार वेलमध्ये उतरले.आमदार संजय कुटे आणि गिरीश महाजन यांनी अध्यक्षांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला.मात्र परिस्थितीचे भान ठेवत आमदार आशिष शेलार यांनी
संजय कुटे, गिरीश महाजन यांच्यासह सर्व आमदारांना वेलमधून आपल्या जागेवर घेऊन गेले.दरम्यान, या वादामुळे भाजपच्या १२ आमदारांना निलंबीत करण्यात आले असून यात पराग अळवणी, राम सातपुते,संजय कुटे,आशिष शेलार,अभिमन्यू पवार, गिरीश महाजन,अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे,जयकुमार रावल, योगेश सागर,नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे.यामुळे आता हे आमदार एक वर्ष विधानसभेचा कोणत्याही कामात भाग घेता येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More