गौण खनिज (वाळू) चोरी केल्याप्रकरणी , चोपडा पोलिसात गुन्हा दाखल , चोपडा – धनवाडी रस्त्यालगत पाटाच्या चारीलगत झाली कारवाई
चोपडा प्रतिनिधी :—

चोपडा तालुक्यात अवैध वाळू वाहतूक दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे .यासंदर्भात रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत तहसीलदार अनिल गावित यांना खडे बोल सुनावले होते तसेच कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्त्याचे वा पदाधिकाऱ्यांचे ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करीत असल्यास त्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे असेही त्यांनी सूचित केले होते . त्या दिवसापासून चोपडा महसूल विभाग व पोलीस यंत्रणा अवैध वाळू वाहतूक विरोधात कारवाईसाठी सक्रीय झाले आहेत त्याच धर्तीवर धनवाडी – चोपडा रस्त्यावर अवैध वाळू चोरी केल्याप्रकरणी चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की ,चोपडा धनवाडी रस्त्यावर पाटाच्या चारी लगत स्वराज कंपनीचे 744 एफई निळ्या पांढर्या रंगाचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच 19 एपी 8479 व निळ्या रंगाची विना क्रमांकाची ट्रॉलीत तीन हजार रुपये किमतीची 1 ब्रास वाळू अवैध पद्धतीने वाहतूक होताना आढळून आल्याने पो हे का विकास पाटील चोपडा शहर पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरून राकेश कमलाकर कोळी रा कोळंबा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर व तीन हजार रुपये किमतीचे 1 ब्रास वाळू असा एकूण तीन लाख तीन हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे .पुढील तपास पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना ज्ञानेश्वर जवागे करीत आहे













