चोपडा येथील युवकाचा घराची गच्ची साफ सफाई करीत असतांना इलेक्ट्रिक शॉक लागून  शॉक लागून दुर्देवी मृत्यू..

चोपडा येथील युवकाचा घराची गच्ची साफ सफाई करीत असतांना इलेक्ट्रिक शॉक लागून  शॉक लागून दुर्देवी मृत्यू

चोपडा शहरातील  महावीर नगर मधील रहिवासी युवकाचा घराची गच्ची साफ सफाई करीत असतांना इलेक्ट्रिक शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार,आज दि.०६जुलै रोजी सकाळी ९:०० वाजेच्या सुमारास सोपान कोळी हा युवक आपल्या घराच्या गच्चीवर साफ सफाई करीत असतांना घरावरून गेलेल्या ११हजार केव्हीच्या हायपर टेन्शन इलेक्ट्रिक तारांना हातातील लोखंडी सळईला  तारचा स्पर्श लागल्याने शॉक लागून तो जमीनीवर आदळला त्यास पाटील अक्सिडेंट हाॅस्पिटलला दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.त्यास सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे.त्याच्या पश्चात आई व लहान बंधू विपुल हा आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More