वंचित बहुजन आघाडी तर्फेअरुणा बाविस्कर यांचा उमेदवारी अर्ज दाखल


चोपडा:-(प्रतिनिधी)
प्रस्तापित पक्षांना जबरदस्त धक्का देत यंदाच दाखल झालेला वंचित बहुजन आघाडी ने धडक देत आज उमेदवारी दाखल केली आहे .त्यांचा उमेदवार म्हणून अरुणा ताई बाविस्कर यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शुभांगी भारदे यांच्या कडे दाखल केली.जे खरोखरच वंचित आहेत जे सत्ताधाऱ्यांच्या त्रासाला पिचलेले आहेत, विद्यार्थ्यांच्या समस्या असो तालुक्याचा विकास असो सर्व प्रकारच्या विकास कामे निवडून आल्यावर करणार आहे असे उमेदवार सौ अरुणा संजीव बाविस्कर म्हणाल्या घरकुल योजना ,आदिवासींच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती समस्या आम्ही सोडवणार,तालुक्याच्या विकासाला बांधील असणार आहे… हक्क कसे प्राप्त करावे हे आम्ही जनतेला सांगणार.चर्मकार युवा जिल्हाध्यक्ष विनोद खजुरे,अशोक बाविस्कर, समाधान सपकाळे,कृष्णा सोनवणे,महेंद्र वाडे,निलेश भालेराव,भरत सोनवणे,सुनील भालेराव,अविनाश बाविस्कर ,डॉ नवल मराठे,बापू बाविस्कर, जियाउद्दिन काजी,पौर्णिमा सोनवणे, कलाबाई वाडे , लताबाई वाडे,यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More