बहुजन समाज पार्टी कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रविंद्र गवई यांच्या हस्ते
ब स पा विजयी होणार ..

चोपडा(प्रतिनिधी)-चोपडा विधानसभा मतदार संघात बहुजन समाज पार्टीकडून ऍड.याकूब साहेबु तडवी हे निवडणूक रिंगणात आहेत.त्यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रविंद्र गवई यांच्या हस्ते पाटील दरवाजा चोपडा येथे नुकतेच करण्यात आले त्या नंतर प्रतिमा पूजन करून प्रचाराला सुर्वात करण्यात आली.ऍड याकूब तडवी हे उच्चशिक्षित असून व्यवसायाने ते वकील आहेत त्यांचा या मतदार संघात दांडगा जनसंपर्क असून निव्वळ समाजाचेच साधारणतः २० हजार मते असल्याने इतर समाजात देखील त्यांचा प्रभाव असल्याने त्यांचा विजय पक्का आहे.आपल्या वकिली क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब लोकांचे खूपच कामे केली आहेत.१९९५ साली त्यांनी रावेर मतदार संघात मधुकरराव चौधरी यांच्या विरुद्ध बसपा कडुन निवडणूक लढविली होती अगदी थोडया फरकाने त्यांचा पराभव झाला होता.दरवेळेस तडवी समाजावर अन्याय करून आदिवासी समाजाला उमेदवारी दिली जाते मग या समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी केव्हा मिळेल?असा सवाल या समाजाकडून उपस्थित झाल्याने याकूब तडवी यांच्या रूपाने संधी देण्यात आल्याचे तडवी समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सांगितले. तळागाळातील माणसासाठी माझी उमेदवारी असून मला सेवेची संधी द्यावी असे आवाहन ऍड. याकूब साहेबु तडवी यांनी केले आहे.
याप्रसंगी कार्यक्रमास संजय अहिरे,सचिन बाविस्कर, ऍड. इमाम तडवी,भुरसिंग बाविस्कर, बाळू कोळी,मुबारक तडवी,भुषण साळुंखे,मुराद तडवी,प्रशांत बाविस्कर, सचिन तडवी, कादर तडवी,समाधान बाविस्कर, अनिल भालेराव, संजू तडवी,अनिल वाडे, तस्लिम तडवी,अरविंद वाडे, मुसा तडवी, संदीप सोनवणे, हमीद तडवी,संदीप साळुंखे, सुलेमान तडवी,श्रीकांत सैंदाणे, मिलिंद सोनवणे, दिनेश शिरसाठ, लालचंद नागदेव,तुषार शिरसाठ, सादिक तडवी, समीर तडवी,नागेश्वर साळुंखे, अर्जुन भालेराव, अजित तडवी,नाना करनकाळ,फिरोज तडवी, दगडू साळुंखे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते












