चोपड्यात रेशनिंगचा गहू पकडला : आरोपीस मुद्देमालासह अटक : तालुक्यात खडबळ

चोपड्यात रेशनिंगचा गहू पकडला : आरोपीस
मुद्देमालासह अटक : तालुक्यात खडबळ

चोपडा ( प्रतिनिधी )—–
रेशनिंगचा गहूच्या दहा गोण्या मालवाहू छोटा हत्ती या वाहनातून अनधिकृतपणे घेऊन जात असतांना नागरिकांनी त्यास अडवून ग्रामीण पोलीसांच्या हवाली केल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजता कुसुंबा-अनवर्दे रस्त्यावर घडली.या घटनेने चोपड्यात एकच खडबळ उडाली आहे. याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनला जिवनाश्यक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून,या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.घोडगाव ता.चोपडा येथून रेशनिंगच्या गहूचे २५ कट्टे मालवाहू छोटा हत्ती गाडी क्रमांक एम. एच.१८ ए.ए.२२७० या गाडीत अनधिकृतपणे घेऊन जात असल्याचा नागरिकांना संशय आल्यांनी त्यांनी

कुसुंबा-अनवर्दे रस्त्यावर आज १४ रोजी सोमवारी सकाळी १०.३० वाजता गाडी अडवून, तहसीलदार अनिल गावित व ग्रामीण पोलीसांना दूरध्वनीद्वारे खबर दिली. यावरून पोलीसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मालवाहू छोटा हत्ती गाडी व त्यातील चाळीस किलो वजनाचे पंचवीस कट्टे (गोण्या) असा एकूण सतरा हजाराचा गहू व छोटा हत्ती गाडी जप्त केली.या प्रकरणी तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी संजय रमेश ईखणकर यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशनला भाग-६ गुरनं.१६/२०१९जिवनाश्यक कायदा कलम ३ व ७ अन्वये रामकृष्ण गोकुळ शिंपी (वय-४७) रा.कापडणे ता.जि. धुळे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्चना करपूडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More