मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी तरुणांनी सामूहिक प्रयत्न करावे- डॉ.भावना भोसले

चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय व चोपडा पंचायत समिती यांच्या संयुक्त विदयमाने मतदार जागृती मोहीम २०१९ या अंतर्गत डॉ.भावना भोसले (गटशिक्षणाधिकारी व निवडणूक नोडल अधिकारी,चोपडा) यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत तसेच मतदान करण्यासाठी सर्व नागरिकांना प्रोत्साहित करावे व निवडणुकीत कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करावे. धर्म,वंश, जात यांचा वापर न करता निर्भीडपणे व मुक्त वातावरणात मतदान करावे असे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले व या कार्यक्रमात मतदार शपथ घेण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. डी.ए.सूर्यवंशी, प्रमुख अतिथी डॉ. भावना भोसले, श्री. युवराज पाटील (केंद्रप्रमुख, चोपडा पंचायत समिती) तसेच उपप्राचार्य डॉ. के.एन.सोनवणे, उपप्राचार्य श्री.बी.एस.हळपे, श्री. डी.डी.कर्दपवार, श्री. भूषण पवार हे उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. डी.ए.सूर्यवंशी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, राजकारणात तरुणांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन विधायक कार्य करावे. तसेच नागरिकांनी जागृत राहून योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करावे व मतदानाच्या दिवशी आपले मूलभूत कर्तव्य पार पाडावे असे आवाहन याप्रसंगी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. डी.डी.कर्दपवार यांनी केले व सूत्रसंचालन श्री. भूषण पवार यांनी केले तर आभार श्री. विशाल पाटील यांनी मानले. यावेळी सौ.एम.टी.शिंदे, श्री.एम.एल.भुसारे, सौ.सुनिता पाटील, श्री.एस.बी.पाटील, श्री.व्ही.डी.शिंदे, श्री.हनुमंत पाटील व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.












