सी आय एस एफ च्या जवानांचा अनाथांना मदतीचा हात

चोपडा:-(प्रतिनिधी)— तालुक्यातील वेले येथील अमर संस्था संचलित बालकाश्रम वेले झारखंड राज्यातील धनबाद येथील सी आय एस एफ चे जवानांची एक तुकडी विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्त करण्यासाठी थांबली होती.जवळपास एक महिना त्या जवानांची राहण्याची व्यवस्था येथे करण्यात आली होती.या कालावधीत त्यांनी येथील अनाथ मुलांशी चांगलीच गट्टी जमली .मिळालेल्या वेळेत त्यांनी येथील अनाथ मुलांना चांगले प्रेम दिले.शौर्याच्या गोष्टी सांगितल्या तसेच धनत्रयोदशी निमित्ताने बालकांना मिष्टान्न भोजन दिले.त्या संपूर्ण सी आय एस एफ च्या तुकडी कडून त्यांनी येथील मुलांसाठी निधी जमा करून३८५००₹ रोख देणगी या अनाथाश्रमातील मुलांना दिली. त्या सी आय एस एफ टीमचे इन्स्पेक्टर प्रशांत प्रसून यांचा सत्कार बालकाश्रम चे व्यवस्थापक शेषराव पाटील यांनी केला.यावेळी अमर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,सी आय एस एफ च्या टीमचे सब इन्स्पेक्टर विकास राठी,ए के सिंग,हेड कॉन्स्टेबल एस व्ही शिंदे,डी एम चौधरी तसेच बालकाश्रम चे ललित सोनवणे, बबन वारडे, श्रीकांत पाटील,अमोल पाटील,मुकेश राजपूत,रवींद्र पाटील ,निवृत्ती महाजन आदी उपस्थित होते.












