दोन मुस्लिम प्राध्यापकांना पीएचडी मार्गदर्शनाचे मान्यता

*दोन मुस्लिम प्राध्यापकांना पीएचडी मार्गदर्शनाचे मान्यता*



डॉ मोहम्मद रगीब मोहम्मद उस्मान ज्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथून आपले शिक्षण पूर्ण केले आणि जे श्रीमती शरद चंद्रिका सुरेश पाटील फार्मसी कॉलेज, चोपडा जिल्हा जळगाव महाराष्ट्र येथे औषधविज्ञान विभाग प्रमुख म्हणून गेल्या 14 वर्षांपासून कार्यरत आहेत, त्यांना जुलै 2022 मध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याच्या शासकीय विद्यापीठाकडून (कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव) कडून मान्यता मिळाली.

त्याच बरोबर मुंबई विदयापीठातून शिक्षण पूर्ण केलेले आणि नंदुरबार येथील रुलर फाउंडेशन नंदुरबार येथील वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय अक्कलकुवा येथे प्राणिशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉ. मोहम्मद जुबेर शेख यांना प्राणीशास्त्र विषयात पीएचडी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शासकीय विद्यापीठाची मान्यता प्राप्त झाली, हे दोन्ही प्राध्यापक चोपडा जिल्हा जळगाव शहरातील रहिवासी आहेत आणि या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले आहेत. आपल्या शहरातील हे स्थान मिळविणारे ते मुस्लिम समाजातील पहिले व्यक्ती आहे .या दोन्ही प्राध्यापकांचे दहावीपर्यंतचे शिक्षण मुस्तफा अंगलो उर्दू हायस्कूल चोपडा येथे झालेले आहे, त्यामुळेच चोपडा शहरातील मुस्लिम समाजासाठी ही अभिमानाची बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More