*प्रताप विद्या मंदिर चोपडा येथे सकाळ विभागात 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त वेशभूषा स्पर्धा उत्साहात संपन्न ……*
प्रताप विद्या मंदिर चोपडा येथील विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विद्यालयाची परंपरा कायम ठेवत सकाळ विभागात 9 ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत तसेच भारतीय स्वातंत्र्य उत्सवाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त क्रांतिकारकांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत मराठी विभागातील एकूण 22 विद्यार्थी तर उर्दू विभागातील एकूण 12 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. सदर स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे सकाळ विभागाचे पर्यवेक्षक एस.एस.पाटील हे तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत गुजराथी यांची उपस्थिती लाभली.


स्पर्धेचे परीक्षण पी.पी.शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्पर्धा आयोजक नरेंद्र एन. महाजन यांनी केले. सदर स्पर्धेला उर्दू विभागाचे एन. वाय.मलिक व एजाज शेख तसेच ज्युनिअर कॉलेजच्या कुलकर्णी मॅडम यांची देखील उपस्थिती लाभली. नरेंद्र महाजन सरांनी विद्यार्थ्यांना 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे महत्त्व विशद करीत,शिंदे सरांनी वेगवेगळ्या वेशभूषा साकार केलेल्या विद्यार्थ्यांना विविध क्रांतिकारकांची माहिती दिली. तसेच अध्यक्षीय भाषणात संपूर्ण स्पर्धेचा आढावा पर्यवेक्षक एस.एस. पाटील यांनी घेतला. सदर कार्यक्रमाला विद्यालयातील सकाळ विभाग व उर्दू विभागातील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. सदर स्पर्धेतील सर्व विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.














