पंकज प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रभातफेरीने दिला देशभक्तीचा संदेश…

पंकज प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रभातफेरीने दिला देशभक्तीचा संदेश…
चोपडा प्रतिनिधी :—


देशाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने अमृत महोत्सवाची माहिती नागरिकांना व्हावी म्हणून आणि देशाभिमान जागृत व्हावा म्हणून चोपडा येथील पंकज प्राथमिक विद्यालयाने तिरंगा रॅली काढून भारतमातेचा जयघोष करण्यात आला.
सर्व प्रथम पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले यांनी भारताचा राष्ट्र ध्वज उंचावून रॅलीला सुरुवात करण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


रॅली शाळेच्या परिसरातील सर्व कॉलनी परिसरात काढण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम्, हर घर तिरंगा अशा प्रकारच्या जयघोष व घोषणांनी परिसर दणाणून गेला. शालेय विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
सदर रॅली यशस्वीेतेसाठी मुख्याध्यापक एम व्ही पाटील , योगेश चौधरी, चंद्रशेखर चौधरी ,प्रफुल्ल महाजन, स्वप्निल ठाकूर, सचिन लोखंडे, मयूर पाटील, मुकेश पाटील, नितिन वाल्हे, धनश्री जावळे, ज्योती महाजन आदींनी परिश्रम घेतले….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More