चोपड्यात रानभाजी महोत्सवाचे आयोजन

*चोपड्यात रानभाजी महोत्सवाचे आयोजन*
चोपडा प्रतिनिधी :–
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा ) व तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सवाचे आयोजन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले होते.


माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी रानभाजी महोत्सवाचे उदघाटन केले. सातपुडा पर्वतरांगांमध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध आहेत. कंदमूळ, फुलेे, पानांच्या स्वरूपातील या भाज्या पावसाळ्याच्या सुरवातीला जंगलात आढळून येतात. रानभाज्यांच्या संवर्धनातून आदिवासींना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.या रानभाज्यांतून मिळणाऱ्या प्रथिनातून राज्यातील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी केले जाऊ शकते. अनेक रानभाज्यात तर शरीराला पोषक असे औषधी गुणधर्म आहेत. पावसाळ्यात वेलीवर लागणारे कर्टुली ही रानभाजी गर्भवती आणी लहान बालकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. कुर्डूच्या बिया मुतखडा आणि जुनाट खोकला, वृद्धाच्या कफ विकारावर उपयुक्त असल्याचे सांगितले जात आहे. या रानभाजी महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगीतले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More