चोपडयाच्या शिक्षक दांपत्याने साकारले 75 तिरंगे,एक अभिनव उपक्रम

चोपडयाच्या शिक्षक दांपत्याने साकारले 75 तिरंगे,एक अभिनव उपक्रम



स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विवेकानंद विद्यालय चोपडा येथील प्राथमिक शिक्षिका सुनिता राधेशाम पाटील व राधेश्याम पाटील यांच्या संकल्पनेतून विविध वस्तूंपासून 75 झेंडे साकारण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन तहसीलदार अनिल गावित व गट विकास अधिकारी भरत कोसोदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डाॅ.विकास हरताळकर ,उपाध्यक्ष घनश्यामभाई अग्रवाल ,सचिव ॲड.रविंद्र जैन मुख्याध्यापक नरेंद्र भावे ,मुख्याध्यापिका आशा चित्ते यांची उपस्थिती होती .


यावेळी सुनिता पाटील व राधेशाम पाटील यांनी विविध कडधान्य, भाजीपाला, खेळणी ,शैक्षणिक साहित्य ,महिलांचे साहित्य, पुस्तके,पाने, फुले इत्यादींचा वापर करून केशरी, पांढरा व हिरवा अशा पद्धतीने मांडणी केली.अधिकारी वर्गाने असाही उपक्रम होऊ शकतो यांचे कौतुक केले.यावेळी जावेद तडवी, जितेंद्र देवरे, राकेश विसपुते ,विजय पाटील ,गणेश सोनार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More