६ गावठी बनावटीचे पिस्टल व 30 जिवंत काडतुसांसह जवळपास ४० लाखांचा मुद्देमाल जप्त..!!#सातारा जिल्ह्यातील ५ तर चोपड्यातील १ आरोपींस अटक…

*६ गावठी बनावटीचे पिस्टल व 30 जिवंत काडतुसांसह जवळपास ४० लाखांचा मुद्देमाल जप्त..!!*
सातारा जिल्ह्यातील ५ तर चोपड्यातील १ आरोपींस अटक…
चोपडा प्रतिनिधी :—


चोपडा शहर पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. १७ रोजी रात्री चोपडा – शिरपूर रस्त्यावरील इसार कंपनीच्या पेट्रोल पंपाजवळ अवैद्य शस्त्र खरेदी विक्री करतांना सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याजवळून ६ गावठी बनावटीचे कट्टे, ३० जिवंत काडतूस, ४ मोबाईल फोन व फोर्ड एंडेवेअर कंपनीचे चार चाकी वाहन असा एकूण रु. ३७,३७००० किमंतीच्या मुद्देमाल जप्त करीत सातारा जिल्ह्यातील ५ व चोपडा तालुक्यातील १ आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. १७ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास चोपडा ते शिरपुर रोडवर इसार पेट्रोलपंपाजवळ गणेश उर्फ सनी सुनिल शिंदे वय २५ रा. ओगलेवाडी ता. कराड जि.सातारा , मोहसीन हनिफ मुजावर वय 30 रा.युवराज पाटील चौक, मसुर ता.कराड जि. सातारा ,रिजवान रज्जाक नदाफ वय 23 रा. शिवाजी चौक, मलकापुर ता. कराड. जि. सातारा व अक्षय दिलीप पाटील वय २८ रा.रविवार पेठ, कराड जि.सातारा अशांनी अवैद्य शस्त्र खरेदी विक्री करणारा आरोपी सुरज विष्णु सांळुखे रा.कराड जि.सातारा याचे सांगण्यावरुन आरोपी सागर सरदार पुर्ण नांव माहिती नाही (शिकलकर) रा. पारउमर्टी ता.वरला जि.बडवानी याच्या जवळून ६ गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) मॅग्झीनसह तसेच 30 पिवळया धातुचे जिवंत काडतुस हे विनापरवाना व बेकायदेशीर रित्या स्वताच्या कब्ज्यात बाळगून कोणास तरी विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आल्याने चारही जणांना ताब्यात घेण्यात आले. त्याचे ताब्यातील १,२०००० रुपये किंमतीचे ६ गावठी कट्टे, 30,000 रुपये किंमतीचे 30 जिंवत काडतूस, ८७०००/- रुपये किमंतीचे ४ मोबाईल फोन व ३५,००,०००/- रुपये किमंतीची फोर्ड एन्डेव्हर कपंनीचे वाहन क्रंमाक एम एच ५० एल ८१८१ या चार चाकी वाहनासह ३७,,३७,०००/- किमंतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व ६ ही आरोपी हे संगनमताने गुन्हा करतांना मिळुन आल्याने चोपडा शहर पोस्टे. भाग ५ गुरनं. ३३६/२०२२ भादंवि कलम ३४ प्रमाणे आर्म अॕक्ट ३/२५, ७/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.


सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा.पोलीस अधीक्षक चोपडा विभाग कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोहेकाँ. दिपक विसावे, पोना. संतोष पारधी, पोना. संदिप भोई, पोकाँ. शुभम पाटील, पोकाँ. प्रमोद पवार व पोकाँ. प्रकाश मथूरे आदिंच्या पथकाने केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अजित सावळे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More