उत्तमनगर येथे आदिवासी कुटुंबांसोबत दिवाळी साज

चोपडा(वार्ताहर) येथील जीवनज्योती फाऊंडेशन, ए.के.गंभीर सर मित्र परिवार आणि श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तमनगर येथे आदिवासी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. परिसरातील काही आदिवासी पाडे असेही आहेत ते दिवाळी चा आनंद दारिद्यामुळे साजरा करू शकत नाही त्यांच्या चेहऱ्यावर हा आनंद देण्यासाठी जीवनज्योती फाऊंडेशन, ए.के.गंभीर सर मित्र परिवार आणि श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने संकल्प करून दिवाळी च्या दिवशी लासूर गावापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेले आदिवासी पाडा उत्तमनगर येथे दिवाळी साजरी करण्यात आली. लासूर येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नानासाहेब ए के गंभीर सर,कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष कैलास बाविस्कर, जीवन ज्योती फाऊंडेशनचे अध्यक्ष मास्टर टेलर्स, सह सचिव दिलीप पालीवाल, नाटेश्वर पीक संरक्षण सो सा लासुरचे माजी व्हा चेअरमन किशोर माळी सर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर येथील सर्व कुटुंबासोबत संध्याकाळी उपस्थित राहून १५० कुटुंबाना दिवाळी निमित्त फरसाण व गोड पदार्थ घरोघरी देऊन तसेच भाऊबीज निमित्त २१ आदिवासी महिलांना नवी साडी भेट देवून दिवाळी साजरी करण्यात आली.

स्वतासाठी जगत असतांना आपण समाजाचे काही तरी देनलागलो. आपल्याला सारे काही त्यांच्यापेक्षा सहज मिळाले आहे.घेण्यापेक्षा देण्याची वृत्ती हि श्रेष्ट असते. माणसाने माणसातील माणूसपण जागे ठेवणे हि काळाची गरज आहे. त्यासाठी जास्तीत-जास्त लोकांनी अशा उपक्रमात सहभागी झाले पाहिजे. आणि अशा आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद दिला पाहिजे असे प्रास्ताविकात जीवन ज्योती फाऊंडेशन चे सचिव जितेंद्र महाजन यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमासाठी लासूर येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नानासाहेब ए के गंभीर सर,श्रीराम मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष हिम्मतराव महाजन,कोळी महासंघ चे जिल्हाध्यक्ष कैलास बाविस्कर,जीवन ज्योती फाऊंडेशनचे अध्यक्ष मास्टर टेलर्स, सचिव जितेंद्र महाजन,सह सचिव दिलीप पालीवाल,अजय पालिवाल,किशोर माळी सर, हिम्मतराव माळी सर,ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक महाजन,वासुदेव महाजन,सुरेश महाजन,मुरलीधर सोनवणे,नारायण बागुल, विजय बाविस्कर, आरिफ मन्सूरी,योगेश्वर महाजन,नुरा पटेलिया,सादिक पठाण,देविदास मगरे,ह.भ.प.रमेश महाजन,सुरेश उत्तम महाजन, एन टी माळी, लक्ष्मण माळी, रमेश महाजन, नरेंद्र महाजन,संदीप महाजन, संजय कुंभार,राजू कुंभार,श्री संत सावता माळी युवक संघ शाखा लासुर चे अध्यक्ष नरेंद्र महाजन, उपाध्यक्ष जितेंद्र माळी, विलास महाजन सर,इंजि.भूषण महाजन,उत्तम नगर येथील पोलीस पाटील नरसिंग पावरा, A – 1 क्लासेस चे संचालक राहुल पाटील सर,भारतीय पत्रकार महासंघ तालुका संपर्कप्रमुख परेश पालीवाल,ग्रामपंचायत कर्मचारी भिका पिंजारी,शुभम महानुभाव आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच ए के गंभीर सर, हिम्मतराव रामदास महाजन, हिंमतराव माळी सर,दिलीपजी पालिवाल,किशोर माळी सर,सुरेश उत्तम महाजन,सोमनाथ सोनार, मास्टर टेलर्स,नरेंद्र रघुनाथ महाजन, अरुण भाऊसाहेब,नरेंद्र उखा महाजन,दिलीप बेडिस्कर, इजि.भाऊसाहेब महाजन,जितेंद्र महाजन,विनोद महाजन सर, राहुल पाटील सर,वासुदेव महाजन वायरमन या दानशूर व्यक्तींनी ऊपक्रमासाठी सहकार्य केले.
या उपक्रमाचे यशस्वितेसाठी A – 1 क्लासेस चे संचालक राहुल पाटील सर, सरस्वती क्लासेस चे संचालक विनोद महाजन सर, राहुल मगरे,सौरभ महाजन,यश महाजन, ज्ञानेश महाजन,यांचे अनमोल सहकार्य लाभले. सदर कार्याक्रमाचे सूत्रसंचलन जीवन ज्योती फाऊंडेशन संचालक प्रेमराज शेलकर व आभार A – 1 क्लासेस चे संचालक राहुल पाटील सर यांनी केले.













