लग्नाचे आमिष दाखून १७वर्षीयअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात एका विरुध्द पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल…

लग्नाचे आमिष दाखून १७वर्षीयअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात एका विरुध्द पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल…
चोपडा प्रतिनिधी :—


सचिन उर्फ टिंगल्या रा. कालिकुंडी ता. वरला जि. बडवानी ( म प्र ) याने त्याच्याच गावातील अल्पवयीन मुलीवर तिच्या संमतीविना चोपडा येथील माऊली वजन काट्यासमोर तसेच हरियाणा राज्य व सेंधवा (म प्र ) येथील नातेवाईकांच्या घरी अनेक वेळा शारीरिक संबंध केले म्हणून अल्पवयीन फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपी सचिन उर्फ टिंगल्या याचा विरुध्द चोपडा शहर पोलिस ठाण्यात पोकसो कायदा कलमा नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी वय १७ वर्षे ५ महीने रा. कालीकुंडी ता. वरला जि. बडवाणी ( मध्य प्रदेश) ही दि. ८ जुलै २०२२ रोजी तिची बहिणीकडे यांच्या चोपडा येथील राहत्या घरी राहावयास आली. त्यादरम्यान फिर्यादी ची बहीण हिने फिर्यादीस, “गावामध्ये तु सचिनच्या नावाने बदनाम झाली” असे सांगितल्याने, दोघींमध्ये भांडण झाले. त्यामुळे फिर्यादी हिने आरोपी सचिन ऊर्फ टिंग्लया मेवा रा. कालीकुंडी ता. वरला जि. बडवाणी ( मध्य प्रदेश) यास फोन करुन तिला घेवुन जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे दि.२९ जुलै २०२२रोजी फिर्यादी चोपडा शहर बस स्टैंड येथे आल्यानंतर आरोपी सचिन याने सदर ठिकाणी येवुन फिर्यादीस तुझ्यासोबत लग्न करायचे असल्याचे सांगुन तिला चोपडा बस स्टॅड परिसरामधुन बसने लकडीया ( महाराष्ट्र) येथे नातेवाईकांकडे घेवुन गेला. तेथे एक दिवस राहील्यानंतर, हरीयाणा येथील आरोपी याचा मित्र राहुल यांच्या घरी ४ दिवस राहीले. त्या ठिकाणी आरोपी याने फिर्यादीच्या संमतीशिवाय ३ वेळा शारीरीक संबंध केले. त्यानंतर तेथुन सेंधवा (मध्य प्रदेश) येथे आरोपीच्या नातेवाईकाच्या घरी येवुन तेथे देखील आरोपी याने फिर्यादीच्या संमतीशिवाय शारीरीक संबंध केले.

त्यानंतर वरला येथे | मुळगावी आल्यानंतर, फिर्यादी यांने वरला पोलीस स्टेशन जि. बडवानी मध्य प्रदेश येथे दि. ६ ऑगस्ट २०२२ रोजी तक्रार दिली असुन, वरला पोलीस स्टेशन येथे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन, सदर गुन्हयाची कागदपत्रे वरिष्ट कार्यालयामार्फतीने चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली आहेत. त्या नुसार सदर गुन्हा चोपडा शहर पोलीस ठाण्यात सी सी टी एन एस भाग ५ गु र न ३५०/२०२२ भा द वि कलम ३७६,३७६(२), पोकसो कायदा कलम ३,४,५ व ६ नुसार दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याच्या अधिक तपास चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण हे करीत आहेत….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More