उसावरील पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी औषध फवारणीसाठी आर्थिक सहाय्य द्या! अरुणभाई गुजराथी यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
चोपडा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात यंदा खराब हवामानामुळे ऊस पिकावर पांढरी माशीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे यंदा ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांनी तर आमच्या शेतातील ऊसच काढून फेकून द्यावा लागेल अशी भिती व्यक्त केली आहे. अशा संकट काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ड्रोन मशीन उपलब्ध करून औषध फवारणीसाठी आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जेष्ठनेते प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे लेखीउसावरील पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी औषध फवारणीसाठी आर्थिक सहाय्य द्या! अरुणभाई गुजराथी यांची पालकमंत्र्यांकडे मागणी पत्राद्वारे मागणी केली आहे.


चोसाका गेल्या वर्षी बारामती ऍग्रो कंपनीला भाडेतत्त्वावर दिल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. त्यामुळे यंदा तालुक्यात ३७०० हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झालेली आहे. एव्हढ्या मोठ्या क्षेत्रावर लागवड झालेली असतांना यावर्षी खराब हवामानामुळे चोपडा तालुक्यात ऊसावर पांढऱ्या माशीचा प्रमाणात झाल्याने प्रादुर्भाव झाल्याने उसाचे पीक धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे एकूण क्षेत्रापैकी जवळपास ८० ते ९० टक्के क्षेत्रावरील उस पिकावर पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. काही शेतकऱ्यांनी तर आमच्या शेतातील ऊसच काढून फेकून द्यावा लागेल अशी भिती व्यक्त केली आहे. एकंदरीत ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठनेते तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे ड्रोन मशीन उपलब्ध करून औषध फवारणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करा अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना लेखी पत्र देतांना चोसाका चे चेअरमन अतुल ठाकरे, संचालक निलेश पाटील व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील उपस्थित होते














