जनतेचा प्रचंड प्रतिसादाने तात्काळ लोन मेळावा सम्पन्न …२५ कोटी रुपये लोन मंजूर…

जनतेचा प्रचंड प्रतिसादाने तात्काळ लोन मेळावा सम्पन्न …२५ कोटी रुपये लोन मंजूर…
चोपडा प्रतिनिधी :–


यज्ञवैकल्य हॉलमध्ये व्यापारी महामंडळ व रोटरी क्लब चोपड़ा,जिल्हा उद्योग केंद्र,प्रचिती मीडिया आयोजित लोन मेळाव्याचे उदघाटन विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते व व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष अमृतराज सचदेव , प्रविण गुजराथी, लोन मेळावा आयोजक पंकज सर (चार्टर्ड अकॉउंटेन्ट,जळगाव)*रोटरी क्लब प्रेसिडेंट ॲड रूपेश पाटील, नितिन अहिरराव, अतुल ठाकरे, प्रा.भरत पाटील यांचा उपस्थितीत सम्पन्न झाला.


मेळाव्याला 200 लोकांनी नवीन कर्ज मागणी साठी विविध बँकांमध्ये आपल्या कर्जासाठी विचारणा केली. लोन मेळाव्याला सुमारे ३५ बँक उपस्थित होत्या.आलेल्या प्रत्येक लोन मागणाऱ्या ग्राहकाचे समाधान करण्यात आले. सुमारे १४ कोटीचे लोन मंजूर करण्यात आले.व ११ कोटीचे लोन प्रोसेस मध्ये आहे.असे म्हणजे एकूण २५ कोटीचे लोन मेळाव्यातून लोकांना दिले जाणार आहे व उर्वरित बाकी राहिलेल्या लोकांचे लोन कागदपत्र पूर्ण झाल्यावर देण्याचा मानस आहे.लोन मेळावा आयोजनबद्दल लोकांनी आनंद व्यक्त केला व अनेक बँका एका छताखली भेटल्याने समाधान व्यक्त केले.

लोन मेळावा यशस्वी करण्यासाठी उपक्रम प्रमुख संजय श्रावगी, संजय कानडे,सनी सचदेव,राजस जैन,सिद्धार्थ पालीवाल,मनोज कोष्टी,चेतन टाटिया,प्रफुल्ल स्वामी,प्रफुल्ल पाटील, नोमान काजी,संजय शर्मा,रोटरीचे सचिव गौरव महाले, मनोज पाटील, अनिल जोशी तसेच संजय श्रावगी (कार्याध्यक्ष)सुनील बरडीया(उपाद्यक्ष),श्याम सोनार (उपाध्यक्ष),दीपक राखेचा(उपाध्यक्ष),राजेन्द्र जैन (सचिव),नरेंद्र तोतला(सचिव) व सर्व व्यापारी महामंडळ पदधिकार्यांनी अनमोल सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More