बारामती ऍग्रो ला वेठीस धरून संचालक मंडळाचे श्रेयवादा पायी चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांवर पांढरी माशी चे संकट शेतकऱ्यांचे जीवावर उठणार #पत्रकार परिषदेत एस बी पाटील यांची स्पटोकती…
चोपडा (प्रतिनिधी):-चोपडा तालुक्यात गेल्या तीन महिन्यापासून ऊसवर पांढरी माशी चा प्रादुर्भाव झाला आहे, चोसाका चे संचालक मंडळ तेव्हा निद्रिस्त अवस्थेत होते,आता अचानक बारामती ऍग्रो ला ब्लॅक मेल करून फवारणी भलेही उशिरा करा पण फवारणी दर कमी करा असा आग्रह करून फवारणी आठवडा भर लांबवली त्या काळात सारा ऊस पांढरी माशी फस्त करेल त्याची चिंता नाही,फक्त श्रेय आम्हाला मिळावे ही भूमिका.गेल्या पंधरा दिवसांपासून शेतकरी कृती समिती ने सरकारी यंत्रणेचे मागे लागून पाठपुरावा करून संपूर्ण परिसराचा सर्व्हे करून घेतला,७५%नुकसान आजच झाल्याचा त्यांचा अहवाल असल्याने त्यांनी एकच दिवसात फवारणी साठी ₹१५००/- प्रती हेक्टर(दोन हेक्टर पर्यंत) फवारणी खर्चाच्या ५०%रक्कम म्हणजे जवळ जवळ ₹१५००/- प्रती हेक्टरी मंजूर करून दिली. ती मदत तात्काळ द्यावी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील,आमदार लताताई सोनवणे,दोघे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व श्री उन्मेष पाटील यांनी शेतकरी कृती समितीची मागणी प्रमाणे तात्काळ कार्यवाही करणेचे आदेश देखील दिलेत.

बारामती ऍग्रो अतिशय सकारात्मक रीतीने शेतकऱ्यांना मदत करणेचे भूमिकेत होती,त्यांनी दहा ड्रोन व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट शी संपर्क करून घेवून बि व्ही एम नावाचे औषधे देखील उपलब्ध करून देणे संदर्भात चर्चा देखील केली,फवारणी ₹६००/-+ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चे औषधाचा खर्च ₹२६३/-+जो प्रवासाचा खर्च असेल असे साधारणपणे ₹८८०/- येवू शकतो असा अंदाज होता,म्हणून अंदाजे तात्पुरते ₹९००/- जमा करणेचे ठरले व सगळ्यात महत्वाचे म्हणजे जी बचत करता येईल तेवढी करून देण्याचे त्यांनी मान्य केले होते.त्यानुसार आज गणेश चतुर्थी चे दिवशी फवारणी देखील सुरू होणार होती.परंतु संचालक मंडळाला त्यानंतर जाग आली व फवारणी चे पैसे कमी व्हावेत यासाठी आग्रह धरला व म्हणून बारामती ऍग्रो ने त्यांच्याच कृषी विज्ञान केंद्रात औषध तयार करणे सुरू केले ते साधारणपणे रविवार पर्यंत तयार होऊन सोमवारी ते आपणाकडे येईल व त्यानंतर फवारणी सुरू होईल.त्यासाठी दर कमी झालेत व ते ₹७००/- प्रती एकर झालेत.

म्हणजे एक आठवडा उशिरा फवारणी होईल त्या काळात शेतातील पांढरी माशी बसून राहील का?ती तर नुकसान करेल व इतर पिकांना देखील मारक ठरेल त्याचे काय?
उशिरा फावरणीला आल्याने प्रत्येक जण माझे आधी करेल त्यात स्थानिक मंडळींचा जसे ऊस तोडी चे वेळेस कमिशन घेतले तसा तर हेतू नाही ना ,अशी शंका येत असल्याचे एस बी पाटील यांनी सांगितले. व आज १००रुपयांचे खर्च वाचविणारी मंडळी शेतकऱ्यांचा ऊस तोडताना हजारो रुपये दलाली घेतली तेव्हा गप्प का होती?आपल्याच जवळच्या माणसाचे देखील ऊस उभे राहिले तेव्हा देखील असा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असता?.
जेव्हा हृदय विकाराने माणूस आजारी असतो तेव्हाच ते इंजेक्शन कामाचे ते पंधरा दिवसांनी देवून काय फायदा?तसेच आज फवारणी गरजेचे असताना फक्त हेकेखोर पणाने बारामती ऍग्रो ला वेठीस धरून शेतकऱ्यांना शंभर रुपयाचा फायदा दाखवून हजारो रुपयेच तोट्यात का घालत आहात? शेतकऱ्यांचे समस्या हजार आहेत, करा त्यासाठी प्रयत्न गेल्या वर्षाच्या पीक विमा चे करोडो रुपये बाकी आहेत लढा त्यासाठी पण शेतकऱ्यांना वेठीस धरू नये असे देखील त्यांनी आवाहन केले.

चोपडा साखर कारखाना अश्या च नियोजन मुळे बंद पडला गेल्या वर्षीचे ऊस तोडीचे हाल व या वर्षीचे पांधरीमाशी चे संकट बहुतेक शेतकरी ऊस काढण्याचे मागे आहेत,बारामती ऍग्रो ला येथे ऊस मिळणे कठीण जाईल अशी परिस्थिती ही मंडळी निर्माण करीत आहे.असेही ते म्हणाले.
शेतकरी बांधवांना फवारणी साठी आग्रह शेतकरी कृती समितीने धरला परंतु आता उशीर झाल्याने किती पीक वाचेल हे परमेश्र्वरच जाणो,शेतकरी बांधवांना वस्तुस्थिती कळावी यासाठीच पत्रकार परिषद घेतल्याचे देखील त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस शेतकरी कृती समितीचे भागवत महाजन,प्रशांत पाटील,प्रा.प्रदीप पाटील,नारायण पाटील,नितीन निकम,अजित पाटील,योगेश पाटील,कुलदीप पाटील हजर होते.













