सेवानिवृत्त सैनिक देवेंद्र वाघ यांचे चोपडा नगरीत जल्लोषात स्वागत

*सेवानिवृत्त सैनिक देवेंद्र वाघ यांचे चोपडा नगरीत जल्लोषात स्वागत*



येथील मल्हारपुरा भागातील रहिवासी देवेंद्र आबासाहेब वाघ हे २१ वर्षे सीआरपीएफ मध्ये देश सेवा करून ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. २१ वर्षाच्या काळात त्यांनी जम्मू काश्मीर, बिहार, झारखंड, गुजरात, ईशान्य भारत, छत्तीसगड यासारख्या देशातील दहशतवादी तसेच नक्षलग्रस्त भागात राष्ट्र समर्पित सेवा दिलेली आहे.

मागील एक वर्षापासून ते अति शीघ्र कृती दल अर्थात रॅपिड ॲक्शन फोर्स (100 BN RAF, Ahmadabad) अहमदाबाद येथे सेवारत होते. त्यांच्या सेवापुर्ती निमित्त शहरवासीयांनी त्यांची डिजेच्या तालावर देशभक्तीपर गीते सादर करून तसेच घोड्यावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुक बस स्थानक परिसरातून छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, तपस्वी मारुती चौक, भवानी माता मंदिर या मार्गे त्यांचे निवासस्थानापर्यंत काढण्यात आली. शहरवासीयांनी फुलांच्या पाकळ्या व आरतीने त्यांचे स्वागत व सत्कार केला.

एसटी महामंडळ, आनंदी भवानी संस्थान, जय भवानी मंडळ, महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना यांनी त्यांचा सत्कार केला. मिरवणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गिरीश आप्पा पाटील, माजी उपनगराध्यक्ष किशोर चौधरी, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, नगरसेवक गजेंद्र जयस्वाल, देवा पारधी, मोहन बापू, आगार व्यवस्थापक संदेश क्षिरसागर, उपप्राचार्य डॉ. किशोर सोनवणे यांचे सह अनेक बंधू-भगिनी व कुटुंबीय सहभागी झालेले होते. देवेंद्र वाघ हे एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव व लेखाधिकारी योगराज पाटील यांचे लहान बंधू तर प्रा. शैलेश वाघ यांचे मोठे बंधू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More