तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रताप विद्या मंदिराचे यश,प्रथम क्रमांक प्राप्त

*तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रताप विद्या मंदिराचे यश,प्रथम क्रमांक प्राप्त*

चोपडा (प्रतिनिधी): ४९ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या अनुषंगाने चोपडा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय अकुलखेडा येथे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्य निर्मिती आणि प्रदर्शन गटात प्रताप विद्या मंदिराने यश संपादन केले आहे. शाळेचे उपशिक्षक पंकज प्र. शिंदे यांनी प्राथमिक शिक्षक गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी आता त्यांची निवड झाली आहे.

अंकपट्ट्या, अक्षरपट्ट्या, शब्दपट्ट्या तयार करत अंक आणि अक्षर ओळख करण्यासाठी उपयुक्त साध्या, सोप्प्या शैक्षणिक साहित्याची निर्मिती त्यांनी केली होती. या साहित्याचा उपयोग करत खेळातून ज्ञान संपादन करण्याच्या मनोरंजक पद्धतीतून विद्यार्थ्यांचे स्वयंअध्यापन घडून येते. ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीत सदर शैक्षणिक साहित्य उपयुक्त ठरते.


त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल चोपडा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजाभाई मयूर, अध्यक्ष शैलाजी मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, सचिव माधुरीताई मयूर, संचालक चंद्रहासभाई गुजराथी आणि सर्व कार्यकारी संचालक मंडळ सदस्य तसेच मुख्याध्यापक पी एस गुजराथी,उपप्राचार्य जे एस शेलार, उपमुख्याध्यापक एस जी डोंगरे, पर्यवेक्षक एस एस पाटील, पी डी पाटील, माधुरी पाटील,संस्थेचे समन्वयक गोविंद गुजराथी, आदींनी पंकज शिंदे यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More