चोपडा येथील शिक्षकाचा जळगावला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन

चोपडा येथील शिक्षकांचा जळगावला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन




चोपडा येथील कस्तुरबा :माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक विकास शिळवणे कोष्टी यांचे रेडक्रॉस सोसायटी जवळ चक्कर येऊन कोसळल्याने अकस्मात मृत्यू झाल्याची घटना आहे.

रविवार दि.४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास कस्तुरबा माध्यमिक विद्यालय, चोपडा येथील जेष्ठ शिक्षक श्री विकास पंडितराव कोष्टी यांचे तिव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांची अंतयात्रा सायंकाळी ०६:०० वाजेला चौंडेश्वरी माता मंदिर, पाटील गढी चोपडा येथून निघणार आहे. याबाबत त्यांच्या नातेवाईकांना हि घटना एकूण धक्का बसला असून शिक्षक वर्गाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी गर्दी केली आहे. विकास शिळवणे कोष्टी हे आज जळगावत नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित ग. स. च्या वार्षिक सभेत आले होते.

त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता सीएमओ डॉ. यासीर खान यांनी त्यांना मयत घोषित केले. त्यांच्या अचानक जाण्याने शिक्षक वर्गात शोककळा पसरली आहे.. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More