दुबईत मराठी कुटुंबाकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव…

दुबईत मराठी कुटुंबाकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव

चोपडा प्रतिनिधी
दुबईमध्ये स्थायिक झालेले प्रणव बिरावी व स्वप्नील बिरारी या मराठी कुटुंबियांकडून गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जातो.विशेष म्हणजे, दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरण संवर्धनाचा जागर गणेशोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

पर्यावरणपूरक वस्तूंचा आकर्षक पद्धतीने वापर करत गुहेतील बाप्पा असा अनोखा देखावा साकारण्यात आला आहे. दुबईत वेगवेगळ्या शहरांत स्थायिक झालेल्या ६०० हून अधिक मराठी कुटुंबियांनी बिरारी यांच्या घरी भेट घेऊन गणेशाचे दर्शन घेतले आहे. त्यांनी साकारलेल्या पर्यावरणपूरक देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे.



दुबईत स्थायिक झाल्यानंतर गेल्या १३ वर्षांपासून घरगुती गणेशोत्ससव साजरा केला जात आहे. २०१६ पासून पर्यावरणपूरक उत्सवाचे स्वरूप देण्यात आले. बिरारी यांनी यंदा गुहेतील बाप्पा ही संकल्पना साकारली आहे. त्यासाठी १८० किलो पेपरचा वापर केला आहे. १०० मी. स्टील रॉडचा वापर करून लाकडी पट्ट्या, टिश्यू पेपर, स्टील वायर, कार्ड बोर्ड आदी साहित्य वापरत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. यासह महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे रक्षण होण्याच्या दृष्टीने संदेश देणारे देखावे यापूर्वी साकारण्यात आले होते.

हा देखावा साकारण्यासाठी खालील मित्र मंडळाचा मोलाचा हातभार आहे त्यात रमाकांत पटेल, नलिनी पटेल ,अनीतोश रायकर, श्वेता रायकर ,मनोज पाटील, मयुरी पाटील चिन्मय पाटील, ललित माळी, प्रयाग निकुम स्वप्निल बिरारी, श्रद्धा बिरारी प्रणव बिरारी, श्वेता बिरारी
आजपर्यंतच्या साकारलेल्या देखाव्यांची यादी पुढील प्रमाणे 2016 किल्ल्यातील बाप्पा 2019 डोंगर दऱ्यातील बाप्पा ,2020 पर्णकुटीतील,शेतातील बाप्पा 2021 सुवर्ण मंदिरातील बाप्पा ,2022 गुहेतील बाप्पा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More