चोपड़ा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची कार्यकारिणी घोषित शहर अध्यक्ष पदी रविंद वाघ…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या शहर अध्यक्ष पदी रविंद वाघ.
चोपड़ा येथे झाली कार्यकारिणी घोषित.


चोपड़ा (प्रतिनिधि)रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची कार्यकारिणी नुकतीच चोपड़ा येथे घोषित करण्यात आली.उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख रमेश मकासरे यांच्या आदेशाने व चोपड़ा येथील तालुका अध्यक्ष भिवराज रायसिंगे यांच्या वतीने रवींद्र वाघ यांची एकमताने निवड करण्यात आली.


भिवराज रायसिंगे यांची पुन्हा तालुका अध्यक्ष पदी फेरनिवड करण्यात आली.लवकरच पक्ष वाढ़ीसाठी सर्वच तालुक्यातील खेड़या पाड्यात जावून बैठका घेवून तरुण कार्यकर्ते एकत्र करुंन आगामी निवडणुकीत ही सहभाग घेवून विजय प्राप्त करू असा विश्वास तालुकाध्यक्ष भिवराज रायसिंगे यांनी व्यक्त केला.


यावेळी उप तालुका अध्यक्ष महेंद्र करनकाळ,किसान सेल चे तालुका अध्यक्ष गोरख वानखेड़े,युवक तालुकाध्यक्ष विनोद बडगुजर,,महेश वसंतराव पाटिल मराठा आघाडी तालुका अध्यक्ष,तालुका सम्पर्क प्रमुख पुरुषोंत्तम शेटे,उपप्रमुख कन्हयालाल सोनवणे,भीमसिंग जोशी,महेंद्र धारपवार,आणि सोशल मीडिया प्रमुख आईटी सेल चे जिल्ह्याचे सम्पर्क प्रमुख महेंद्र करनकाळ व पत्रकार मिलींद सोनवणे हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More