प्रताप विद्या मंदिरात स्व. संध्याताई मयूर यांना आदरांजली..

*प्रताप विद्या मंदिरात स्व. संध्याताई मयूर यांना आदरांजली*
चोपडा (प्रतिनिधी) चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिरात संस्थेच्या माजी सचिव स्व. संध्याताई मयूर यांना 13 व्या स्मृतिदिनानिमित्त स्वर सुमनांजली अर्पण करण्यात आली.


यावेळी प्रास्ताविकात प्रशालेचे मुख्याध्यापक पी एस गुजराथी यांनी संध्याताईंनी केलेल्या कार्याचा उजाळा देत आठवणी जागृत केल्या. सचिव पदाची धुरा सांभाळत संस्था व शाळेची केलेली सर्वांगीण प्रगती साधत विद्यार्थी शिक्षक शाळा हा बहुआयामी त्रिकोण दृढ करण्यात मोलाचे योगदान दिले. स्वरसुमनांजली अर्पण करीत संगीत कलादालनातर्फे ‘बीज अंकुरे अंकुरे’ हे गीत सादर करण्यात आले तसेच सुप्रसिद्ध धृपद गायिका मेघनाताई सरदार यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून ‘श्रमिकहो घ्या येथे विश्रांती’ या गीतातून आदरांजली वाहिली.


स्व. संध्याताईंच्या समाधीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करण्याचा बहुमान यावेळी संस्थेच्या सर्व ज्ञानशाखांमधून इ. 9 वीतून प्रथम आलेले विद्यार्थी चि. रूपक महाजन, कु. प्रिया चौधरी तसेच नागलवाडी माध्यमिक विद्यालयातील कु. दिव्या पाटील या विद्यार्थ्यांना मिळाला. स्मृती सुमनांजली नंतर शाळेच्या सकाळ विभाग , उर्दू विभाग व जुनिअर कॉलेज यांच्या वतीने विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. त्याचे उद्घाटन संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर यांच्या हस्ते रासायनिक अभिक्रियेचा प्रयोग सादर करून करण्यात आले.

तसेच स्व. संध्याताई यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रशालेत रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई यांच्या सहयोगाने आंतरराष्ट्रीय रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. त्यात विद्यालयातून सुमारे 750 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच संस्थेच्या अध्यापक विद्यालयामार्फत शिक्षकांसाठी हॉलीबॉलक्रीडा स्पर्धा घेण्यात आली. त्यात 6 संघांनी सहभाग नोंदविला.


सदर कार्यक्रमास स्व. संध्याताईंच्या मातोश्री चंद्रकलाबेन मयूर, संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर, संचालक चंद्रहासभाई गुजराथी, किरणभाई गुजराथी, विवेकानंद विद्यालयाचे अध्यक्ष, डॉ. विजयकाका पोतदार , डॉ. विकासकाका हरताळकर, डॉ.प्रवीण सप्तर्षी, प्रा. रमाताई सप्तर्षी पुणे, योगीभाई मयूर, अविनाश कुलकर्णी, प्रा. रुबिताई सप्तर्षी बेलसरे ,मयूर परिवारातील सर्व सदस्य, तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक पी एस गुजराथी, उपमुख्याध्यापक एस जी डोंगरे, जुनिअर कॉलेजचे उपप्राचार्य जे एस शेलार ,पर्यवेक्षिका माधुरी पाटील, पर्यवेक्षक एस एस पाटील संस्थेचे समन्वयक गोविंद गुजराथी , डी टी महाजन, माजी मुख्याध्यापक व शिक्षक तसेच विविध ज्ञानशाखांचे पदाधिकारी शिक्षक बंधू भगिनी लेखनिक कर्मचारी बंधू विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More