प्रताप विद्या मंदिरात विज्ञान प्रदर्शन उत्साहात

प्रताप विद्या मंदिरात विज्ञान प्रदर्शन उत्साहात


चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या माजी सचिव स्वर्गीय संध्याताई मयूर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने प्रशालेतील सकाळ विभाग,उर्दू विभाग, उच्च माध्यमिक विभाग, एमसीव्हीसी विभाग यांच्या वतीने शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात 70 पेक्षा अधिक उपकरणे मांडली गेली होती. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनास खतपाणी घालण्याचा उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला सुद्धा व्यासपीठ मिळाले. इतर शेकडो विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातील उपकरणे पहिली.


रासायनिक अभिक्रियांच्या अभिनव प्रयोगातून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी चोपडा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल,सचिव माधुरीताई मयूर, संचालक चंद्रहासभाई गुजराथी, प्रा. प्रवीण सप्तर्षी, प्रा. रमाताई सप्तर्षी, प्रा. रुबीताई,मयूर कुटुंबीय आणि त्यांचे आप्तेष्ट, संस्थेचे समन्वयक गोविंद गुजराथी तसेच चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या विविध विद्याशाखांचे प्रमुख, पदाधिकारी, शिक्षक बंधू-भगिनी,लेखनिक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.


मुख्याध्यापक पी. एस. गुजराथी, उपमुख्याध्यापक एस. जी. डोंगरे, पर्यवेक्षक पी. डी. पाटील, माधुरी पाटील यांच्या सहकार्याने आणि सकाळ विभागाचे पर्यवेक्षक एस. एस. पाटील, उपप्राचार्य जे. एस. शेलार यांच्या नेतृत्वात सकाळ विभागातील सर्व विज्ञान शिक्षकांच्या परिश्रमातून प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.प्रा. ए. डी. महाजन यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More