चोपडा कसबे सोसायटीला सहकार बोर्डाचा पुरस्कार,
उल्लेखनीय आणि अलौकिक कार्याचा गौरव

चोपडा कसबे सोसायटीला सहकार बोर्डाचा पुरस्कार,
उल्लेखनीय आणि अलौकिक कार्याचा गौरव



चोपडा – येथील सहकार क्षेत्रात आपल्या सचोटीबध्द व सभासद हिताच्या कार्यामुळे ओळख असलेल्या चोपडा कसबे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला जळगाव जिल्हा सहाकार बोर्डाने आपल्या ८४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पुरस्कार देवून गौरवित करण्यात आले.



सहकार बोर्डाने चोपडा कसबे सोसायटीला सहकार क्षेत्रात उल्लेखनीय आणि अलौकिक कार्य करुन संस्था नावा रुपाला आणल्याबद्दल सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. जिल्हा बॅंकेचे चेअरमन व माजी मंत्री गुलाबराव देवकर,माजी जि.प.अध्यक्ष व जिल्हा राष्ट्रवादी कॅाग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील,जिल्हा बॅंक उपाध्यक्ष शामकांत सोनवणे, सहकार बोर्डाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख,उपाध्यक्ष सतिष शिंदे आदिंच्या उपस्थितीत सोसायटीचे चेअरमन प्रवीण गुजराथी,व्हा.चेअरमन भास्करराव पाटील व संचालक संदीप धारपवार यांनी हा पुरस्कार स्विकारला.



माजी चेअरमन स्व.विठ्ठलदास गुजराथी यांनी सुमारे ३५ वर्षे चेअरमन पदावर काम करीत असतांना तोट्यात असलेली चोपडा कसबे सोसायटी आपले कसब वापरून नफ्यात आणली.भाड्याच्या इमारतीत असलेली संस्था व कार्यालय स्वमालकीच्या सुमारे ३३०० स्क्वे.फूट जागेवरील दुमजली इमारतीत आणले.सचोटीपुर्ण कारभार करताना सभासदहित जोपासण्याचे काम करीत नफ्यातून सभासदांना जीवनोपयोगी भेटवस्तू देखील भेट म्हणून दिल्या.गत दहा वर्षांपासून स्व.गुजराथी यांचे सुपूत्र प्रवीण गुजराथी संस्थेची धुरा सांभाळत आहेत.अनेक अडचणींना तोंड देत संस्था फायद्यात ठेवण्यासाठी कसून प्रयत्न करीत आहेत.सभासदांच्या विश्वासामुळे तब्बल पन्नास वर्षांच्या कालखंडानंतर चेअरमन प्रवीण गुजराथी यांच्या नेतृत्वाखाली २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक निवडणुकीचे संचालक मंडळ देखील बिनविरोध निवडून आले आहे.या संचालक मंडळात प्रवीण गुजराथी, भास्करराव पाटील, श्रीकांत नेवे,युवराज महाजन,डॅा.सुभाष देसाई ,प्रवीण देशमुख,गोपाळ चौधरी,दत्तु मराठे,संदीप धारपवार,नारायण बाविस्कर, सिंधूबाई पाटील,विमलबाई देशमुख,उखा धनगर यांचा समावेश आहे.

या पुरस्काराबद्दल संचालक मंडळाचे तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More