चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध शेती उपयोगी यंत्रांचे तरअसेच आत्महत्या ग्रस्त सात शेतकरी कुटुंबाला चेक आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते वाटप…

चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध शेती उपयोगी यंत्रांचे आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते वाटप


चोपडा प्रतिनिधी:-
महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी शेती उपयोगी अवजारे वाटप करण्यात येतात. आत्मा कमिटी व कृषी विभागाच्या वतीने यादी तयार करून गरजू शेतकऱ्यांना साहित्याचे वाटप आ. लता सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच तालुक्यातील आत्महत्या ग्रस्त सात शेतकरी कुटुंबाला स्वाभिमानी योजनेतून प्रतेकी एक रुपयाचे चेक वाटप व तालुक्यातील तीन शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर व दोन शेतकऱ्यांना मका मळणी यंत्र व इतर शेतकऱ्यांना इतर शेतीची अवजारांचे वाटप करण्यात आले

तसेच कांदा चाळ साठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे म्हणाले. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी चोपडा विधानसभेच्या आमदार लता सोनवणे ह्या कटिबद्ध असल्याचे प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले तसेच मागील काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यापासून जीव वाचवण्यासाठी लता कोळी यांनी नदीत उडी घेऊन ७० किलोमीटरच्या जीवघेणा प्रवास करून आपल्या धैर्याने आपला जीव वाचवला त्याबद्दल त्याच्या वीर माता म्हणून २५ हजार रुपये , साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला.या प्रसंगी तहसीलदार अनिल गावित,कृषी अधिकारी दीपक साळुंखे सागर ओतारी,एम.व्ही पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More