शहरात नृत्यमय नवरात्री उत्सवाचे आयोजन..#तालुक्यातील जनतेने उत्सवात सहभागी होऊन आनंद द्विगुणित करावा आयोजकांचे आव्हान..

शहरात नृत्यमय नवरात्री उत्सवाचे आयोजन…


चोपडा प्रतिनिधी :–
चोपडा शहरात प्रथमच भव्यदिव्य असे नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात येत असून सुप्रसिध्द गायक अभिदत्त, शांभवी ठाकूर, आर्यन तिडके, सागर केडुंरकर, आकाश झवेरी, जतिन उदासी, दिवेश राणा, आवेश दरबार, वरूण शर्मा (चु-चा) येत आहेत .


भव्यदिव्य असा नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे .आजपर्यंत असे आयोजन फक्त आणि फक्त मुंबई ,पुणे व गुजरातमध्ये मोठ्या शहरात करण्यात येते असे भव्य आयोजन चोपड्यात सीएनजी ग्रुप, चोपडा पिपल्स बॅक सार्वजनिक सेवा ट्रस्ट, चोपडा तालुका व्यापारी महामंडळ व सहकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन केले आहे .सदर कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दि.२६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर पर्यंत सध्या.६ ते रात्री १० वाजे पर्यंत असुन दररोज प्रत्येक तासात दांडियात सहभागी होणाऱ्यांसाठी प्रत्येक तासांत तीन, एका दिवसात नऊ बक्षिसे असे एकूण नऊ दिवसांचे ८१ बक्षिसे देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात फूड झोन, प्ले झोन, खेळणी असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील तालुक्यातील जनतेने उत्सवात सहभागी होऊन आनंद द्विगुणित करावा व कधीही न घेतलेला अनुभव घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More