व्यवसाय शिक्षण व बदलत्या काळातील आव्हाने.. या विषयावर चोपड्यात कार्यशाळेचेआयोजन..#
व्यवसाय शिक्षण संचालक डी ए दळवी यांची विशेष उपस्थिती..

व्यवसाय शिक्षण व बदलत्या काळातील आव्हाने.. या विषयावर चोपड्यात कार्यशाळेचे आयोजन…
व्यवसाय शिक्षण संचालक डी ए दळवी यांची विशेष उपस्थिती….


चोपडा प्रतिनिधी :–
    जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगांव व श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील खाजगी औ.प्र. संस्था, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यवसाय शिक्षण व बदलत्या काळातील आव्हाने या विषयावर जिल्ह्यातील निदेशकांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेचे उद्घाटन
व्यवसाय शिक्षण संचालक डी ए दळवी यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून पी.एम. वाकडे सहसंचालक  व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, नाशिक हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील अध्यक्ष महात्मा गांधी शिक्षण मंडळ, हे होते.


       प्रा. डॉ. जगदीश पाटील, धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर यांचे व्यवसाय शिक्षण व बदलत्या काळातील आव्हाने या विषयावर बीज भाषण झाले. प्रा. एस. डी. जैसवाल, एस. बी. ई. एस. कॉलेज ऑफ सायन्स, औरगांबाद यांचे व्यवसायीक प्रशिक्षणात आय. ओ. टी. प्रशिक्षणार्थी केंद्रीत दृष्टिकोण आणि सहभागी घटकांच्या नियोजनाचे महत्व या विषयावर व्याख्यान झाले.
पंकज एन. भामरे, शासकीय औ. प्र. संस्था, धुळे. आय. टी. आय. मधील गुणवत्ता व प्रशिक्षण या विषयावर व्याख्यान झाले.


  कार्यशाळेत सर्व सहभागीना सहभाग प्रमाणणत्र देण्यात आले. पाहुण्यांच्या परिचय बी आर पाटील यांनी केला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस बी पाटील यांनी केले तर आभार पी आर सोनार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डी जे सोमानी ,पी आर सोनार, सं मा पाटील ( जिल्हा व्यवसाय शिक्षण – प्रशिक्षण अधिकारी जळगाव ) आदींनी परिश्रम घेतले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More