चोपडा आगार येथे एन.एस.यू.आय. च्या वतीने स्वच्छते संदर्भात निवेदन…

चोपडा आगार येथे एन.एस.यू.आय. च्या वतीने स्वच्छते संदर्भात निवेदन…


चोपडा प्रतिनिधी :–
माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस आय ॲड. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली , माजी जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील व तालुकाध्यक्ष प्रा.प्रदीप पाटील व परिवहन सेल उत्तर महाराष्ट्र देवकांत चौधरी यांच्या उपस्थितीत प्रदेश सचिव एन एस यु.आय. काँग्रेस महाराष्ट्र राज्य चेतन बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली चोपडा आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले .


चोपडा बस स्थानकात अत्यंत अस्वच्छता दिसून येत आहे. या अस्वच्छतेमुळे प्रवाशांना व एस.टी. कर्मचाऱ्यांना अत्यंत त्रास होत असल्याने या अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची भीती नाकारता येऊ शकत नाही, तरी आपण याकडे लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी आणि महाविद्यालय व शाळेतील विद्यार्थ्यांची एस.टी. बस वेळेवर लागत नसल्याने विद्यार्थ्यांना व त्या सोबतच प्रवाशांना ही अत्यंत त्रास होत आहे. त्यामुळे एस.टी. बसेस फेऱ्या नियमित वेळापत्रकानुसार सुरू कराव्यात अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.


यावेळी एन.एस.यू.आय. कडून प्रवाशांना व विद्यार्थ्याना सूचनात्मक विनंती करण्यात आली की, आपण सर्व आपले हक्कासाठी मागण्या करतो परंतु आपल्याही काही जबाबदाऱ्या आहेत . एस टी महामंडळ बस स्थानकावर स्वच्छता राखण्यास आपणही सहकार्य करावे. यावेळी तालुकाध्यक्ष एन एस यू आय सोहन सोनवणे, एस.आर.ओ. घनश्याम पाटील, महाविद्यालयीन प्रमुख गोपाल धनगर, सपना बोरसे,प्रिया साळुंखे,प्रियांका सोनवणे, देवश्री बोरसे,सीमा कोळी,यामिनी साळुंखे,मोहिनी सोनवणे,हेमंत पाटील,समाधान काविरे, विवेक जाधव,आदित्य साळुंखे,अमंत कढरे, मयूर पाटील,उदय धनगर,रोहन जाधव,निखिल पाटील,कुणाल पारधी आदी कार्यकर्ते उपस्थित होते….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More