चोपडा कसबे सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न
चोपडा – येथील चोपडा कसबे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन प्रवीण गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा बॅकेचे संचालक घनःश्याम अग्रवाल यांच्या विशेष उपस्थितीत पीपल्स बॅंकेच्या सभागृहात संपन्न झाली.या सभेत बारा विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करण्यात आली.तसेच जळगाव जिल्हा सहकार बोर्डाचे बाविस्कर यांनी सभासदांना मार्गदर्शन देखील केले.सभेचे अहवाल वाचन व सुत्रसंचालन संचालक श्रीकांत नेवे यांनी केले.तर आर्थिक पत्रकांचे वाचन सेक्रेटरी मनोहर शिरसाठ यांनी केले. यावेळी शेकडो सभासदांची उपस्थिती होती.


यावेळी व्हा.चेअरमन भास्करराव पाटील, संचालक युवराज महाजन,डॅा.सुभाष देसाई, प्रवीण देशमुख, गोपाळ चौधरी,संदीप धारपवार,विमलबाई देशमुख, सिंधुबाई पाटील, उखा धनगर,दत्तु मराठे आदि उपस्थित होते.आभार प्रदर्शन चेअरमन गुजराथी यांनी केले.














