प्रेमसंबंध न ठेवल्याचे कारणावरुन अल्पवयीन मुलीस जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग करणाऱ्या युवकावर पोक्सो कलम प्रमाणे गुन्हा दाखल…

प्रेमसंबंध न ठेवल्याचे कारणावरुन अल्पवयीन मुलीस जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग करणाऱ्या युवकावर पोक्सो कलम प्रमाणे गुन्हा दाखल…


महाराष्ट्र9 न्यूज नेटवर्क
चोपडा येथील अल्पवयीन मुलगी असल्याचे माहिती असून देखील वेळोवेळी तिचा पाठलाग करुन प्रेमसंबंध निर्माण करण्यास तिच्यावर दडपण टाकून खूनासह बदनामीची धमकी देणा-या तरुणाविरुद्ध विविध कलमानुसार चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर दगडू पाटील रा. मल्हारपुरा चोपडा असे संबंधीत तरुणाचे नाव आहे.



चोपडा येथील महाविद्यालयात शिक्षण घेणा-या सतरा वर्षाच्या अल्पवयीन तरुणीचा अनेक दिवसांपासून सागर पाटील हा वेळोवेळी पाठलाग करत होता. तिच्या मोबाईल क्रमांकावर तो वेळोवेळी संपर्क साधून तिला बळजबरी प्रेमसंबंध निर्माण करण्यास हैरान करत होता. प्रेमसंबंध ठेवले नाही तर दिड महिण्यापुर्वी घडलेल्या ऑनर किलिंग घटनेप्रमाणे तुझा खून करुन टाकेन तसेच सोशल मिडीयावर तुझी बदनामी करेन अशी धमकी देत तिचा हात पकडून तुला माझ्यासोबत लग्न करावेच लागेल अशी गळ त्याने घातली. तिच्या मनाला लज्जा वाटेल असे गैरकृत्य करत चापटांनी मारहाण केल्याने संतप्त अल्पवयीन त्याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलिसात ३५४(३) ३२३, ५०६, सह पोक्सो कलम १२ प्रमाणे चोपडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील स.पो.नि. अजित सावळे करत आहेत. सागर यास अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More