चोपडा उपजिल्हा रुग्णालयात ५५ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया यशस्वी..

चोपडा उपजिल्हा रुग्णालयात ५५ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया यशस्वी..


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क


चोपडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वैजापूर ३७ ,लासुर १५ ,उपजिल्हारुग्णालय ३ याप्रकारे एकूण ५५ दुर्बिणीतून बिनटाका कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या.


शिबीर उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.तुषार देशमुख,माता बाळ संगोपन अधिकारी डॉ. मनीषा बांगर ,मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज पाटील उपजिल्हारुग्णालय,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर,सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी ,चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी ,स्त्री रोग तज्ञा, डॉ. पवन पाटील ,डॉ. गुरुप्रसाद वाघ, डॉ. चंद्रहास पाटील, भुल रोग तज्ञ डॉ. नरेंद्र पाटील ,यांच्या उपस्थितीत नाशिक येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञा डॉ वर्षा लहाडे यांनी सर्व ५५ शस्त्रस्क्रिया माता सुरक्षित ठेवून यशस्वी पार पाडल्या ,सर्व चोपडा तालुक्यातील आरोग्य विभागातील सर्व आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी ,आशा सेविका सर्व परिचर , विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहकार्य केले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More